जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

..या समाज मंदिरास आपले सहकार्य राहील-आश्वासन

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

आज राज्यातील तेली समाज शहरात विखुरलेल्या स्वरूपात असून व्यापारात आढळून येत आहे.या समाजातील नागरिक प्रामाणिक व कष्टाळू शब्दाला जागणारे असून त्यांनी कोपरगावात संत जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त समाजमंदिर उभे करण्याचा जो निर्णय घेतला आहे तो स्तुत्य असून आपण या समाजाला या कार्यात नक्कीच मदत करू असे आश्वासन कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी एका कार्यक्रमात दिले आहे.

आ.आशुतोष काळे व आपण विधानसभेतील एकाच सभागृहात काम करत असून तर समाजाच्या या कार्यास नक्कीच मदत करतील असा विश्वास व्यक्त केला आहे.व आपल्या आजी माजी स्व.खा.केशरकाकू क्षीरसागर यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांनी आपल्याला जनसंग्रह करण्याची जी प्रेरणा दिली त्या बळावर आपण आमदार म्हणून विधानसभेत गेलो-आ.संदीप क्षीरसागर

कोपरगाव शहरातील कर्मवीरनगर येथील संत जगनाडे महाराज बहुउद्देशीय सेवाभावी ट्रस्टच्या वतीने आज दुपारी एक वाजेच्या सुमारास संत जगनाडे महाराज पुण्यतिथी व समाज मंदिराचा सभामंडपाचा भूमिपूजन सोहळा आ.आशुतोष काळे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिर्डी येथील जेष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब लुटे हे होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,संत तुकाराम महाराज यांचे काळी संतांचे समाजाला कीर्तनांच्या आणि अभंगांच्या माध्यमातून शिकवण देण्याचे कार्य चालू होते.तेव्हा संत तुकाराम महाराजांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात झाली होती.संत तुकारामांच्या सावलीत राहून त्यांनी तुकारामांचे अभंग उतरवून घेण्यास संत जगनाडे महाराजांनी सुरुवात केली.त्यांनी स्वतः काही रचना केल्या आहेत.त्यांना मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे.त्यांचीच आठवण ठेऊन कोपरगावात हा सभामंडप उभा करण्याचा निर्णय संत जंगनाडे महाराज बहू उद्देशिय ट्रस्ट यांच्या वतीने माजी नगरसेवक व ट्रस्टचे अध्यक्ष रमेश गवळी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला आहे.हि गौरवाची बाब आहे.आपण त्यानां नगरपरिषदेत उमेदवारी दिली होती तर अन्य स्वप्नील पवार यांनाही पद दिले आहे.त्यांच्या समाज मंदिराच्या कार्यात आपण काही अकमतरता पडू देणार नाही असेही ते शेवटी म्हणाले आहे.

या कार्यक्रमास बीडचे आ.संदीप क्षीरसागर हजर होते त्यांनी,”आ.काळे व आपण विधानसभेतील एकाच सभागृहात काम करत असून तर समाजाच्या या कार्यास नक्कीच मदत करतील असा विश्वास व्यक्त केला आहे.व आपल्या आजी माजी स्व.खा.केशरकाकू क्षीरसागर यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांनी आपल्याला जनसंग्रह करण्याची जी प्रेरणा दिली त्या बळावर आपण आमदार म्हणून विधानसभेत गेल्याची आठवण करून दिली आहे.

यावेळी महाराष्ट्र तैलिक महासभेचे कोषाध्यक्ष गजानन शेलार,महासचिव प्रा.डॉ.भूषण कर्डीले,काँग्रेस ओ.बी.सी.सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे,येवला नगरपरिषदेचे नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर,सेनेचे उत्तर जिल्हाध्यक्ष राजेंद्र झावरे,माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे,सेनेचे शहराध्यक्ष कलविंदर दडियाल आदींसह बहुसंख्य नागरिक,महिला उपस्थित होत्या.

या कार्यक्रमासाठीराजेंद्र राऊत,सुरेश राऊत,संतोष शेलार,राजेंद्र सोनवणे ज्ञानेश्वर क्षीरसागर,आदींनी प्रयत्न केले आहे.कार्यक्रमाचे प्रास्तविक ट्रस्टचे अध्यक्ष रमेश गवळी यांनी केले तर सुत्रसंचलन ट्रस्टचे सचिव रामदास गायकवाड व सौ.गायकवाड यांनी तर उपस्थितांचे आभार युवराज सोनवणे यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close