कोपरगाव तालुका
कोपरगावात पोलीस स्थापना दिन साजरा
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना २ जानेवारी १९६१ साली करण्यात आली.त्यावेळचे तत्कालीन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान केल्याने त्या दिवसापासून दरवर्षी २ जानेवारी हा पोलीस स्थापना दिन म्हणून साजरा करण्यात येतो.यानिमित्त महिला सुरक्षाविषयी जनजागृती करण्यात येत असून कोपरगाव शहर पोलीस दलाच्या वतीने पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम घेण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना विविध शस्र दर्शन,रस्तासुरक्षा,वाहतुक नियम,महिला सुरक्षा,पोलीस ठाण्याचे दैनंदिन कामकाज,याबाबत मार्गदर्शनासाठी परिसंवाद व चर्चासत्र घेण्यात आले आहे.त्यात विद्यार्थ्यांना गुन्हेगारीपासून प्रवृत्त करण्यास प्रोत्साहित करण्यात आले आहे-हर्षवर्धन गवळी,पोलीस निरीक्षक,शहर पोलीस.
नूतन वर्षात दि.२ ते ५ जानेवारी या काळात साजरा होणार्या पोलीस स्थापना दिनात रोज सकाळी ११ ते २ या कालावधीत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाळा,महाविद्यालये येथे जावून पोलीस अधिकारी विद्यार्थ्यांना विविध शस्र दर्शन,रस्तासुरक्षा,वाहतुक नियम,महिला सुरक्षा,पोलीस ठाण्याचे दैनंदिन कामकाज,याबाबत मार्गदर्शनासाठी परिसंवाद व चर्चासत्र घेण्यात आले आहे.त्यात विद्यार्थ्यांना गुन्हेगारीपासून प्रवृत्त करण्यास प्रोत्साहित करण्यात आले आहे.व शाळाबाह्य विद्यार्थ्यांवर पोलिसांचे विशेष लक्ष असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे.शहरातील विविध शाळातील वरिष्ठ वर्गातील विद्यार्थ्यांना थेट पोलीस ठाण्याची सैर घडवली आहे.व तेथे विविध कारणांनी जप्त करण्यात आलेली उभी वाहने दाखविण्यात आली आहे.त्या बाबत विद्यार्थ्यांनी आपली चिकित्सा विविध प्रश्न विचारून जाणून घेतली आहे.व अधिकारी व पोलीस कर्मचारी यांचे कर्तव्य समजून घेतले आहे.त्याला विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.
या उपक्रमास श्रीमान गोकुळचंद विद्यालयाचे मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर,उपमुख्याध्यापक रवी पाटील,दिलीप तुपसैंदर,पर्यवेक्षक रमेश गायकवाड,बाळासाहेब कुलधरण,विजय आव्हाड,रघुनाथ लकारे,सुरेश गोरे,अतुल कोताडे, एकनाथ जाधव,यासंह पोलीस अधिकारी,कर्मचारी सहाय्यक फौजदार शैलेंद्र ससाणे,राम खारतोडे,सचिन शेवाळे,गणेश मैड,प्रकाश कुंढारे,महिला पोलीस कॉन्स्टेबल विजया दिवे,प्रीती बनकर,सुवर्णा कानवडे,आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी शहरातील विविध शाळांत जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुशांत घोडके यांनी केले आहे.उपस्थितांचे आभार राम खारतोडे यांनी मानले आहे.