कोपरगाव तालुका
कोपरगावात अवैध वाळू चोरी विरुद्ध गुन्हा दाखल
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशी आरोपी पावन भास्कर कुऱ्हे व अन्य दोन अनोळखी इसम यांनी शिंगणापूर शिवारातील नारंदी नदीतून अवैध वाळू चोरी केली प्रश्नी आज कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
कोपरगाव तालुक्यातून अवैध वाळू उपसा करण्यास जिल्हाधिकारी यांनी प्रतिबंध घेतला आहे.असे असतानाही आज शिंगणापूर शिवारात आरोपी पवन कुऱ्हे व त्याचे अन्य दोन अनोळखी सहकारी यांनी अवैधरित्या वाळू चोरी केल्या प्रश्नी आज गुप्त खबऱ्या मार्फत पोलिसांना बातमी मिळाली होती.त्या नुसार हा गुन्हा दाखल झाला आहे.
कोपरगाव तालुक्यातून अवैध वाळू उपसा करण्यास जिल्हाधिकारी यांनी प्रतिबंध घेतला आहे.असे असतानाही आज शिंगणापूर शिवारात आरोपी पवन कुऱ्हे व त्याचे अन्य दोन अनोळखी सहकारी यांनी अवैधरित्या वाळू चोरी केल्या प्रश्नी आज गुप्त खबऱ्या मार्फत पोलिसांना बातमी मिळाली होती.त्या नुसार पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली असता त्याठिकाणी हे तीन आरोपी आपल्या पांढऱ्या रंगाच्या झेनॉन गाडीत (क्रं.एम.एच.१५ ए.जी.८५०८)या गाडीत अवैधरित्या वाळू चोरी करताना आढळून आले आहे.त्यावेळी अन्य दोन आरोपी पोलीस आल्यावर त्या घटनास्थळावरून पोबारा करून पळून गेले आहे.घटनास्थळावरून पोलिसांनी वरील क्रमांकाची गाडी व वाळू असा ९५ हजार ५०० रुपयांचा अवैज जप्त केला आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक व सहाय्यक फौजदार ससाणे यांनी भेट देऊन पाहणी केली आहे.
कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी आरोपी विरुद्ध आपल्या दप्तरी गु.र.क्रं.१२/२०२१ भा.द.वि.कलम ३७९,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक दारकुंडे हे करीत आहेत.