कोपरगाव तालुका
फुले यांच्या जयंतीनिमित्त कोरोना योध्यांचा सन्मान
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील रेणुका नगर भागातील वैदू समाजाच्या तीस मुलींचा हिमोग्लोबिन तपासणी शिबीर सावित्रीबाई फुले यांच्या १९० व्या जयंतीनिमित्त घेण्यात आले आहे.
स्त्रिया हे परमेश्वराचे रूप आहे तिच्या विचारांना स्वातंत्र्य द्या.हीच खऱ्या अर्थाने सावित्रीबाई यांना आदरांजली ठरेल-दौलतराव जाधव,पोलीस निरिक्षक तालुका पोलीस ठाणे.
सावित्रीबाई फुले ज्ञानदिप प्रतिष्ठान तर्फे सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास कृषी तज्ञ रंजना आढाव नगरसेविका दीपा गिरमे,विद्याताई सोनवणे योगा शिक्षिका विमल पुंडे,उमाताई वहाडणे,स्नेहा पाटणी आदी उपस्थित होते.
या वेळी संस्थेच्या अध्यक्षा संगीता मालकर म्हणाल्या की,”समाजातील महिलांचे महत्वाचे असून बाल विवाह बेकायदा असल्याने ही प्रथा बंद करावी त्यामुळे या मुलींचे आयुष्य बरबाद होते.त्याचे प्रतिकूल मुलींच्या आरोग्यावर होतात,लहान वयात मातृत्वाचे ओझे फार घातक आहे,आहाराबाबत,शालेय शिक्षण पूर्ण करण्याबाबत मार्गदर्शन व सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी संस्थेचे अध्यक्षा संगीता मालकर यांनी दिले आहे.
आहाराबाबत मार्गदर्शन डॉक्टर रणदिवे मॅडम यांनी केले.तसेच समाजातील काबाडकष्ट करून कुटुंबातील मुलांना उच्च शिक्षण देवून तसेच कोरणाच्या महामारीच्या काळात काही गृहिणींनी पर राज्यातील लोकांना सतत दोन महिने पाणी वाटप केले डॉक्टर्स,पोलीस,आरोग्य कर्मचारी, शेतकरी ,शिक्षिका अशा दहा कोरोना योध्यां महिलांचा सन्मान कोपरगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वर्षा आगरकर यांनी केले. कार्यक्रमास उपस्थितांचे आभार नसरीन इनामदार यांनी मानले.