कोपरगाव तालुका
पत्रकारितेत परिवर्तन घडविण्याची ताकद
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
पत्रकारितेत जगाचे परिवर्तन घडविण्याची ताकद असून पत्रकारांनी सजग राहून आपले वार्तांकन केल्यास कोपरगाव तालुक्याचे प्रश्न मार्गी लागण्यास वेळ लागणार नाही असे स्पष्ट प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक कैलास ठोळे यांनी कोपरगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
महाराष्ट्र शासनाने पत्रकार दिन हा ६ जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त घोषित केला आहे. महाराष्ट्र राज्यात हा दिवस साजरा केला जातो. बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील आद्य पञकार आहे. यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले होते.त्यानिमित्त हा पत्रकार दिन साजरा करण्यात येतो.
कोपरगाव तालुका एज्यूकेशन सोसायटी व श्रीमान गोकुलचंद विद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने आज विद्यालयात कोपरगाव शहरातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला होता.त्या वेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत ठोळे हे होते.
सदर प्रसंगी पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष नानासाहेब जवरे,विद्यालयाचे मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर,पत्रकार मनोज जोशी,पत्रकार रोहित टेके,योगेश डोखे,विद्यालयाचे सचिव दिलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे,मुद्रित व इलेक्टट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”जगात वर्तमानात मोठे क्रांतिकारक बदल होत आहे त्याला भारतही अपवाद नाही.परिवर्तन हा जगाचा नियम आहे.व त्याचा हसत-हसत सामना केला पाहिजे.पत्रकारांनी जगासमोर वास्तव आणले पाहिजे तरच जगात बदल होतो.पाच्छात्य जगात पत्रकारितेला आजही किमंत आहे.वर्तमान पत्रात बातम्या येणे सोपे नाही मात्र कोपरगावचे पत्रकार या बातम्यांना स्थान देत असून निव्वळ राज्यातच नाही तर देशभर महत्वाच्या बातम्या येतात असल्याचे गौरोदगारही त्यांनी काढले आहे व स्वतःचे अनुभव कथन केले आहे.कोपरगाव शहर व तालुक्याची प्रतिमा पाण्याबाबत मलिन झाली असून संगमनेर,श्रीरामपूर,राहाता राहुरी आदी तालुक्याची स्थिती खूप चांगली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.व कोपरगाव बाबत पाणी प्रश्नावर तोडगा निघणे गरजेचे असल्याचे सांगितले आहे.अन्य क्षेत्रात कोपरगाव तालुक्याने मोठी प्रगती केली असल्याचे त्यांनी सांगितले असून उच्च शिक्षण,औद्योगिक व सहकार आदी बाबतीत तालुक्याचा चांगला लौकीक असल्याचे सांगितलें आहे.कोरोना कालखंडात पत्रकारांची भूमिका लक्षवेधी होती.असे कौतुक करून त्यांनी पत्रकारांची एक स्वतंत्र बैठक घेऊन त्यांना सामाजिक प्रश्नाबाबत बोलते करणे गरजेचे असल्याचे त्यांनी शेवटी सांगितलें आहे.
त्यावेळी उपस्थित पत्रकांराचा गौरव करण्यात आला आहे.प्रारंभी श्री.गोकुलचंदजी यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पत्रकार नानासाहेब जवरे यांच्या हस्ते पुष्पहार घालून कार्यक्रमाचा प्रारंभ केला आहे.कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर यांनी केले उपस्थितांना संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत ठोळे व सचिव दिलीप अजमेरे यांनी मार्गदर्शन केले आहे.उपस्थितांचे स्वागत व आभार श्री गोरे यांनी मानले आहे.प्रारंभी उपस्थित पत्रकारांचा सत्कार करण्यात आला आहे.