गुन्हे विषयक
परस्पर लग्न केल्याच्या कारणावरून वृद्धेस मारहाण,पाय मोडला,कोपरगावात गुन्हा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्याच्या नैऋत्येकडे साधारण नऊ कि.मी.अंतरावर असलेल्या घारी ग्रामपंचायत हद्दीतील आरोपी रामदास लक्ष्मण माळी,मीना रामदास माळी यांनी त्याच गावातील फिर्यादी महिला हिच्या घरासमोर दि.२० ऑगष्ट रोजी रात्री ०८ वाजेच्या सुमारास जाऊन,”आमच्या मुलीसोबत तुझ्या नातवाने आम्हाला न विचारता लग्न का केले ? असे म्हणून शिवीगाळ,दमदाटी,करून मारहाण करून मांडी मोडण्यास कारणी भूत झाल्या प्रकरणी फिर्यादी अंजनाबाई आनंदा जाधव (वय-७०) या महिलेने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
फिर्यादी महिलेचा नातवाने काही दिवसापूर्वी त्याच गावातील आरोपी रामदास माळी यांची मुलगी पळवून नेऊन लग्न केले आहे.त्याचा राग आरोपींच्या मनात धुमसत होता.त्यांनी या पार्श्वभूमीवर मागील घटनेचा राग मनात धरून दि.२० ऑगष्ट रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास फिर्यादी महिलेच्या घरी जाऊन त्या महिलेला या लग्ना प्रकरणी जाब विचारला व तिला मारहाण केली आहे.त्यात वृद्ध महिलेच्या मांडीचे हाड मोडले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी महिला व आरोपी हे एकाच गावचे आहेत.फिर्यादी महिलेचा नातवाने काही दिवसापूर्वी त्याच गावातील आरोपी रामदास माळी यांची मुलगी पळवून नेऊन लग्न केले आहे.त्याचा राग आरोपींच्या मनात धुमसत होता.त्यांनी या पार्श्वभूमीवर मागील घटनेचा राग मनात धरून दि.२० ऑगष्ट रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास फिर्यादी महिलेच्या घरी जाऊन त्या महिलेला या लग्ना प्रकरणी जाब विचारला की,”आमच्या मुलीसोबत तुझ्या नातवाने आम्हाला न विचारता लग्न का केले ? असे म्हणून शिवीगाळ,दमदाटी,करून तिला ओट्यावरून खाली ओढून तिला घरचे खालच्या बाजूस ढकलून दिले व तिच्या उजव्या पायाचे मांडीचे हाड मोडण्यास कारणीभूत झाले आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्यादी महिला अंजनाबाई आनंदा जाधव (वय-७०) यांनी गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी घारी परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आरोपी विरुद्ध आपल्या दप्तरी गु.र.क्रं.३११/२०२१ भा.द.वि.कलम ३२५,५०४,५०६,प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एस.ए.कुसारे हे करीत आहेत.