कोपरगाव तालुका
कोपरगावात सार्वजनिक सौचालयाचे उदघाटन संपन्न
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील गांधीनगर भागातील प्रभाग क्रमांक अकरा मधील सार्वजनिक शौचालय उदघाटन सोहळा कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या हस्ते व नगरसेवक मेहमूद सय्यद यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले आहे.
देशातील सर्व शहरांमधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे,यासाठी केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान संपूर्ण देशामध्ये राबविणे सुरू केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वच्छ,सुंदर व पर्यावरणयुक्त देशाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणावर हे अभियान राबविण्यास सुरूवात झाली असून कोपरगाव नगरपरिषदेने त्यास चांगला प्रतिसाद दिला आहे.
देशातील सर्व शहरांमधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे,यासाठी केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान संपूर्ण देशामध्ये राबविणे सुरू केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वच्छ,सुंदर व पर्यावरणयुक्त देशाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणावर हे अभियान राबविण्यास सुरूवात झाली आहे.या अभियानास वाढता प्रतिसाद मिळत आहे.घर स्वच्छ राहिले तर गाव स्वच्छ राहिल.गाव स्वच्छ राहिले तर शहर स्वच्छ राहिल.शहर स्वच्छ राहिले तर राज्य स्वच्छ राहिल,पर्यायाने देशही स्वच्छ राहिल.स्वच्छतेमुळे देशाचे आरोग्यही स्वच्छ राहण्यास मदत होणार आहे. त्यामुळेच पंतप्रधानांनी २ ऑक्टोबर २०१९ पर्यंत देश स्वच्छ करण्याचा संकल्प स्वच्छ भारत अभियानातून मांडला आहे. त्यांचा हा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी महाराष्ट्राचा हातभारही मोठ्या प्रमाणात लागत आहे. पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत संकल्पाला आता महाराष्ट्राने आणखी व्यापक स्वरुप देण्याचे ठरविले आहे.
येत्या पाच वर्षांत भारत हा स्वच्छ देश म्हणून ओळखला जावा, यासाठी केंद्राने राबविलेली योजना महत्त्वपूर्ण आहे. ही योजना यशस्वी होण्यासाठी राज्याचा हातभारही लागणे आवश्यक आहे. त्यासाठीच महाराष्ट्र शासनाने नागरी भागातील स्वच्छतेवर लक्ष केंद्रित केले आहे.त्यातूनच आता राज्यातील नागरी भागात स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) राबविण्यास सुरूवात झाली असून याची अमलबजावणी कोपरगाव नगरपरिषदेत नगराध्यक्ष विजय वाहाडणे यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे.गांधीनगर येथे त्याची अंमलबजावणी झाली आहे.त्याचे नागरिकांनी स्वागत केले आहे.
या वेळी नगरसेवक मेहमूद सय्यद व वर्षाताई गंगुले यांनी नगराध्यक्ष मुख्याधिकारी यांचे आभार मानले आहे.यावेळी माजी नगरसेविका विमल पुंडे, साजीद शेख,शकील सय्यद,मुज्जुभाई सर्जील शेख,रंजीत गायकवाड,भुर्याभाई सय्यद,हुसेनभाई तांबोळी,आब्बुभाई,बंटी शेख,तेजस गंगुले,युसूफभाई राणे, मोसीन सय्यद, आरबाज सय्यद, वसीम शेख,नाजीम भाऊ,भुर्या दादा, ईसराईल शेख,इमरान शेख,चंदुभाऊ नजन,मारुती काटे आदी मान्यवर उपस्थित होते.