कोपरगाव तालुका
सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगांव शहरातील श्रीमान गोकुळचंद विदयालयांत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व महीला शिक्षण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
सावित्रीबाई जोतीराव फुले ह्या भारतीय शिक्षिका,कवयित्री व समाजसुधारक होत्या.त्यांनी आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा सुरू केली.महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतीराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली होती.
सावित्रीबाई जोतीराव फुले ह्या भारतीय शिक्षिका,कवयित्री व समाजसुधारक होत्या.त्यांनी आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा सुरू केली.महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतीराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली होती.आपल्या नायगाव या गावावर त्यांनी एक प्रसिद्ध कविता लिहिली आहे.त्यांचे स्मरण त्यांच्या जयंती निमित्त करण्यात आले आहे.
या प्रसंगी श्री.गो.विदयालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन विदयालयाचे मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांचे हस्ते करण्यात आले.विदयालयाचे जेष्ठ शिक्षक रवि पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.तर सुत्रसंचलन एस.डी.गोरे यांनी तर आभार बी.सी.उल्हारे यांनी मानले आहेत.
या कार्यक्रमाला विदयालयाचे जेष्ठ शिक्षक डी. व्ही.तुपसैंदर,आर.आर.लकारे,शिरसाळे एस.एन,गोसावी के.एस,महानुभाव के.एच,बोरावके आर.आर,गायकवाड ए.जी.रायते यु.एस.वाडीले,एस.एस.,तुपकर आर.एस.आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सुरक्षित अंतर पाळुन उपस्थित होते.
यावेळी विद्यालयांचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दिलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे आदीनी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिना निमित्त त्यांना अभिवादन केले आहे.
या प्रसंगी कु.गौरी लक्ष्मीकांत राठी,सानिया फारुख सय्यद या विद्यार्थ्यांनी “स्त्री शिक्षणाचे महत्त्व व सावित्री बाई फुले” या विषयावर आपले विचार व्यक्त केले आहे.