जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

समताचे ठेवी आणि सेवा देण्याचे कार्य प्रेरणादायी-मराठे

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

समता नागरी सहकारी पतसंस्थेने केवळ ठेव वाढीमध्ये उच्चांक केला नसून सेवा देण्यात देखील उच्चांक प्रस्थापित केला असल्याने देशातील बँकांसाठी या पतसंस्थेचे काम देशाला प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना काढले आहे.

समता पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी आपल्या पतसंस्थेच्या वाढीबरोबरच राज्यातील पतसंस्थांची चळवळ बळकट करण्यासाठी देखील प्रयत्न केलेले आहेत-उदय जोशी,संचालक,नॅशनल फेडरेशन ऑफ बँक अॅड क्रेडीट सोसायटीज या देशातील बँक व पतसंस्था फेडरेशन.

महाराष्ट्रात अग्रगण्य असलेल्या समता नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने सूर्या कॉम्प्लेक्स, बँक रोड कोपरगाव येथील घर पोहोच सोनेतारण व लॉकर सुविधाचा शुभारंभ तसेच क़्यु.आर.कोड यु.पी.आय.कार्यपद्धतीचा शुभारंभ रिझर्व बँकेचे संचालक सतीश मराठे यांच्या हस्ते तर नॅशनल फेडरेशन ऑफ बँक अॅड क्रेडीट सोसायटीज या देशातील बँक व पतसंस्था फेडरेशनचे संचालक व सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री उदय जोशी यांचे प्रमुख उपस्थितीत नुकताच संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.आता दि.३ जानेवारी २०२१ पासून सूर्या कॉम्प्लेक्स,बँक रोड कोपरगाव येथील घर पोहोच सोनेतारण व लॉकर सुविधा ग्राहक व सभासदांसाठी सुरु झाली आहे.

सदर प्रसंगी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे खजिनदार दादाराव तुपकर,नेटविन संचालक अरविंद महापात्रा,मार्केटिंग व्यवस्थापक मसऊद अत्तार,समता पतसंस्थेचे महाव्यवस्थापक सचिन भट्टड,मुख्य कार्यालयातील अधिकारी,पदाधिकारी,कर्मचारी,हितचिंतक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”देशाच्या सहकार चळवळीने आदर्श घ्यावा असे कामकाज समता पतसंस्थेचे आहे.तसेच आर्थिक प्रगतीचे पुढचे पाऊल ओळखून समताने पुढील वाटचाल सुरु केली असून पुढील ५ वर्षानंतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या बाबतीत महाराष्ट्रात अव्वल असेल आणि समताचे अनुकरण इतर सहकार चळवळीतील पतसंस्था करतील यात नेटविन कंपनी महत्वपूर्ण साथ देत आहे.समता राबवीत असलेले सर्वच उपक्रम आणि योजना अभिनंदनीय व कौतुकास्पद असून या सर्व योजना आणि उपक्रम ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचविण्याचे महत्वपूर्ण काम करत आहे यामुळेच पुढच्या दृष्टीने समताची आर्थिक प्रगती होणार आहे असे गौरोद्गार मराठे यांनी शेवटी काढले आहे.

या प्रसंगी बोलतांना नॅशनल फेडरेशन ऑफ बँक अॅड क्रेडीट सोसायटीज या देशातील बँक व पतसंस्था फेडरेशनचे संचालक व सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री उदय जोशी म्हणाले कि,समता पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी आपल्या पतसंस्थेच्या वाढीबरोबरच राज्यातील पतसंस्थांची चळवळ बळकट करण्यासाठी देखील प्रयत्न केलेले आहेत.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी केले.त्यावेळी मान्यवरांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी केला आहे.कार्यक्रमांचे सुत्रसंचलन आणि उपस्थितांचे आभार महाव्यस्थापक यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close