कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुक्यातील रस्त्यांसाठी १९.३९ कोटींचा निधी
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील नागरिकांना वाहतुकीसाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या सावळीविहीर फाटा ते कोपरगाव या १०.५०० कि.मी.रस्त्यासाठी १९ कोटी ३९ लाख ४९ हजार रुपये निधीची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
सावळीविहीर फाटा ते कोपरगाव या रस्त्याचे या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरु करावे याबाबत केंद्रीय रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी यांची देखील दिल्ली येथे भेट घेवून निधीची मागणी केली होती-आ.आशुतोष काळे
आ. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे की,अहमदनगर-मनमाड राष्ट्रीयमार्ग हा मागील काही वर्षापासून नादुरुस्त झाला होता.या रस्त्यावर सावळीविहीर फाटा ते कोपरगाव या १०.५०० कि.मी मार्गावर लहान-मोठी अनेक खड्डे पडल्यामुळे रस्त्याची चाळण होऊन सावळीविहीर फाटा ते कोपरगाव परिसरात अपघातांची संख्या वाढली होती. या मार्गाच्या दुरुस्तीसाठी पाठपुरावा सुरु असतांना अहमदनगर-मनमाड मार्ग सावळीविहिरपासून तोडण्यात येवून सावळीविहीर फाटा, कोपरगाव ते मनमाड या मार्गाला एन.एच.७५२ जी क्रमांक देण्यात येवून सिन्नर, शिर्डी,अहमदनगर, दौंड,बारामती,पैठण ते कर्नाटक राज्यातील शिकोडी पर्यंत राष्ट्रीय महामार्ग १६० मंजूर करण्यात आल्यामुळे सावळीविहीर फाटा ते कोपरगाव या रस्त्याचे भविष्य टांगणीला लागले होते. त्यामुळे या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरु करावे याबाबत केंद्रीय रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी यांची देखील दिल्ली येथे भेट घेवून निधीची मागणी केली होती. सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांच्याकडे रस्ता खराब झाल्यामुळे वाहनधारकांची होत असलेली गैरसोय व होत असलेल्या अपघाताबाबत कैफियत मांडून या रस्त्यासाठी निधी मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्यातून या मार्गावरील खड्डे देखील बुजविण्यात आले होते. व नुकतेच राज्यमार्ग रस्ते वाहतूक मंत्रालयाने या रस्त्याच्या पूर्ण दुरुस्तीच्या कामाची नोटीस प्रसिद्ध केली आहे. यामध्ये चांदवड-मनमाड-कोपरगाव-शिर्डी या राष्ट्रीय महामार्ग ७५२ – जी या मार्गावरील कोपरगाव ते सावळीविहीर फाटा या १०.५०० कि.मी. रस्त्याच्या कामासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. या रस्त्यासाठी अंदाजे १९ कोटी ३९ लाख ४९ हजार १२४ रुपये खर्च अपेक्षित असून रस्ते दुरुस्ती कंपनीला आपली निविदा २७ जानेवारी पर्यंत सबंधित विभागाकडे दाखल करावी लागणार असून निविदा उघडल्यानंतर शासन नियमामुसार पात्र कंपनीला दुरुस्तीचे काम देण्यात येणार आहे.या रस्त्याचे काम घेणाऱ्या कंपनीला तीन वर्षाच्या आत काम पूर्ण करून देणे बंधनकारक आहे.त्यामुळे या रस्त्याची साडेसाती कायमची हटणार आहे. हे वर्ष पूर्ण जीवघेण्या कोरोना संकटाचा मुकाबला करण्यात गेले असून त्यामुळे राज्याची अर्थव्यवस्था डबघाईला आली होती. मागील दोन ते तीन महिण्यापासून अर्थव्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येत असून महाविकास आघाडी सरकारने एवढ्या बिकट परिस्थितीत देखील या रस्त्यासाठी निधीची तरतूद केल्याबद्दल केंद्रीय रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांचे कोपरगाव विधानसभा मतदार संघातील नागरिकांच्या वतीने आभार मानत असून उर्वरित विकासकामांना निधी मिळविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आ. काळे यांनी शेवटी सांगितले आहे.