जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

विकास कामांसाठी ग्रामपंचायतीची भूमिका मोलाची-जाणीव

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

ग्रामीण भागातील नागरिकांच्या विकासाचे मुलभूत प्रश्न ग्रामपंचायतीच्या माध्यमातुनच मार्गी लागत असतात.त्यामुळे जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या विकास कामांना मूर्त रूप देण्यासाठी ग्रामपंचायतीची भूमिका मोलाची असून ग्रामपंचायत हि विकासाच्या बाबतीत अत्यंत महत्वाचा कणा असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी नुकतेच तीलवणी येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

छोट्या खेडेगावाचा कारभार ग्रामपंचायत नावाची स्थानिक स्वराज्य संस्था पाहते.सरपंच,उपसरपंच,ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने हा कारभार पाहिला जातो. पंचायतराजमधील सर्वात खालच्या पण महत्त्वाच्या टप्प्याला ग्रामपंचायत म्हणतात.ग्रामविकासात तिला अनन्य साधारण महत्व आहे-आ.आशुतोष काळे.

कोपरगाव तालुक्यातील तिळवणी ग्रामपंचायत कार्यालय,समाजमंदिर लोकार्पण व जिल्हा परिषद शाळा खोल्यांचे भूमिपूजन नुकतेच आ. काळे यांच्या शुभहस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.

सदर प्रसंगी पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुन काळे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,कारभारी आगवन,सांडूभाई पठाण,राहुल जगधने,चांगदेव गायके,ज्ञानेश्वर पगारे,अशोक वाघ,राजाराम पाटील,सोमनाथ शिंदे,गजानन शिंदे,विश्वनाथ गायके,दत्तात्रय शिंदे,पोपट शिंदे,रामभाऊ खिलारी,वाल्मिक निकम,नानासाहेब निकम,पोपटराव भुजाडे, प्रकाश शिंदे,नंदू रांधवणे,अशोक उकिरडे,इरफान पटेल,पंचायत समिती उपअभियंता उत्तम पवार,शाखा अभियंता राजेंद्र दिघे,लाटे,विस्तार अधिकारी व प्रशासक वाघमोडे,ग्रामसेवक योगेश देशमुख,ठेकेदार विशाल पावले,निखिल गुजराती,माजी सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या सदस्यांनी प्रामाणिकपणे काम केल्यामुळे ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला व त्या माध्यमातून तीळवणी मध्ये १ कोटी ४ लाख रुपयांचे विकासकामे झाली आहेत.मागील पाच वर्षात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहे.जिल्हा परिषद,पंचायत समिती व ग्रामपंचायततीच्या समन्वयातून प्रत्येक गावाचा विकास साधला गेला आहे.तालुक्याच्या विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून पाठपुरावा सुरु आहे.जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून भरीव निधी मिळाल्यामुळेच ग्रामीण भागातील विकासाचे बहुतांश प्रश्न सुटत असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close