कोपरगाव तालुका
लव-जिहाद बाबत राज्यात कायदा करा-कोपरगावात मागणी
जनशक्ती न्यूजसेवा
धारणगाव-(प्रतिनिधी)
लव जिहाद या विषयांवर लवकरात लवकर उत्तर प्रदेश राज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यांत सुद्धा हा कायदा लागू करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या वतीने कोपरगाव तालुका प्रतीनिधी म्हणून आ.आशुतोष काळे विधानसभा सदस्य यांनी हे निवेदन देऊन नुकतीच करण्यात आली आहे.
बिगरमुस्लिम मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे धर्मांतर करणे म्हणजे ‘लव जिहाद’ मुसलमान मुलांनी हिंदू मुलींशी कथितपणे जबरदस्तीनं केलेल्या लग्नाला ‘लव्ह जिहाद’ असं नाव दिलं गेलं आहे.लव-जिहाद कायद्याबाबत पहिली भूमिका घेणारे राज्य उत्तरप्रदेश ठरलं आहे.त्यामुळे आता महाराष्ट्रातही हि मागणीने उचल खाल्ली आहे.
बिगरमुस्लिम मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे धर्मांतर करणे म्हणजे ‘लव जिहाद’ मुसलमान मुलांनी हिंदू मुलींशी कथितपणे जबरदस्तीनं केलेल्या लग्नाला ‘लव्ह जिहाद’ असं नाव दिलं गेलं आहे.लव-जिहाद कायद्याबाबत पहिली भूमिका घेणारे राज्य उत्तरप्रदेश ठरलं आहे.उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घोषणा करून त्याचे कायद्यात रूपांतर केले आहे.यानंतर मध्यप्रदेशच्या शिवराजसिंह सरकारने देखिल लव-जिहाद कायद्याविरोधात पावलं उचलली आहे.याबाबत मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी देखील या कायद्याचा मसुदा विधानसभेत मांडला जाणार असल्याचं सांगितलं आहे.यासोबत आसाम,हरियाणा,कर्नाटक या राज्यांनी देखील समर्थनार्थ भूमिका घेतली आहे.बिहारमध्ये भाजपने आपली सत्ता कायम ठेवल्यानंतर येणाऱ्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीसाठी लव्ह-जिहाद हा मुद्दा कळीचा ठरणार आहे.कारण भाजप खासदार आणि पश्चिम बंगालच्या भाजप महासचिव लॉकेट चटर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये भाजप सत्तेत आल्यास लव्ह-जिहाद विरोधात कायदा तयार करु असे वक्तव्य केले आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगाव तालुक्यात हि मागणी प्रथमच पुढे आली आहे.
हिंदू धर्म व हिंदू संस्कृतील महिलांवरील होणाऱ्या अत्याचार व अन्यायाला प्रतिबंधक बसला जाईल ह्या उद्देशाने राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या सहकार्याने कोपरगाव तालुका प्रतीनिधी म्हणून आ.आशुतोष काळे यांना हे निवेदन देण्यात आले आहे.आगामी हिवाळी अधिवेशनात कोपरगाव तालुक्याच्या वतीने हि मागणी करण्यात आली आहे.आ.काळे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,लव-जिहाद मुळे अनेक हिंदू मुलींना लग्नाचे अमिश दाखवून त्यांच्यावर बलात्कार केले जातात.पुढे त्यांच्या आयुष्याची होरपळ होते.त्यांना वापर करून सोडून दिले जाते.भीतीमुळे त्या तक्रार करू शकत नाही.हि भूमी छात्रपती शिवाजी महाराजांची आहे या भूमीवर हा अन्याय सहन केला जाणार नाही.या गंभीर बाबीची सरकारने दखल घेऊन राज्यात लव-जिहाद विरुद्ध कठोर कायदा करावा व दोषींना कठोर शासन करावे अशी मागणीही त्यांनी शेवटी केली आहे.
सदर प्रसंगी राष्ट्रीय वारकरी परिषद महाराष्ट्र राज्याचे महाराज मंडळी जिल्हा अध्यक्ष वेणुनाथ महाराज विखे,शेळके महाराज,अंभग महाराज,मुठे महाराज, जाधव महाराज,पानसरे महाराज,तरस महाराज,त्यांचप्रमाणे कोपरगाव तालुका कोअर कमिटीचे मार्गदर्शक अशोक महाराज कालेकर,उपाध्यक्ष रंगनाथ महाराज विखे,कुंभारीचे उपाध्यक्ष रिनाकांत महाराज कबाडी,कासलीचे अध्यक्ष योगेश महाराज भगुरे,निकम महाराज,गव्हाणे महाराज, किशोर गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.