कोपरगाव तालुका
..या गावात जागतिक अपंग दिन साजरा
जनशक्ती न्यूजसेवा
संवत्सर-(प्रतीनिधी)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीतील श्री राम दिव्यांग सेवा प्रतिष्ठानच्या वतीने नुकताच जागतिक अपंग दिन विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
जागतिक अपंग दिन दरवर्षी डिसेंबर ३ रोजी जगभरात साजरा केला जातो.सन १९९२ पासून संयुक्त राष्ट्रसंघातर्फे हा दिन जाहीर केला गेला. हा दिवस अपंग व्यक्तींबाबत सामान्य जनतेत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने साजरा केला जातो.
जागतिक अपंग दिन दरवर्षी डिसेंबर ३ रोजी जगभरात साजरा केला जातो.सन १९९२ पासून संयुक्त राष्ट्रसंघातर्फे हा दिन जाहीर केला गेला. हा दिवस अपंग व्यक्तींबाबत सामान्य जनतेत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने साजरा केला जातो.संवत्सर येथेही हा दिवस नुकताच उत्साहात संपन्न झाला आहे.
सदर प्रसंगी अध्यक्ष गोकुळ नामदेव पावडे,उपअध्यक्ष पन्नालाल नेहे,सचिव ज्योती घुले,सदस्य नामदेव पावडे,जीवन पावडे,कैलास पांडव,तुषार बिडवे,बाबासाहेब ईदरखे,नितीन लोखंडे,गिडगे डॉ.काका गायकवाड आश्रमातील ऋषिकश साबळे,प्रज्वल साबळे,वृत्ती मोरे,वैष्णवी पावडे,तारामती कदम,विजय गुंड,आदी मान्यवर उपस्थित होेते