जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

भारत बंदला कोपरगावात मोठा प्रतिसाद

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर लादलेल्या नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात मागील १२ दिवसांपासून दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे.या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी मंगळवार (दि.८) रोजी दिलेल्या भारत बंदची हाक दिली होती.या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव येथे करण्यात आलेल्या निषेध आंदोलनाला कोपरगाव तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

कोपरगाव शहरात आज राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांनी पुकारलेल्या बंदला दुपारी बारा वाजे पर्यंत ९० टक्क्यांपर्यंत तर दुपारून त्यात ढील दिली असल्याचे पोलीस सूत्रांनी दिली आहे.त्यामुळे दुपारून शहर पुन्हा पूर्ववत झाले आहे.तर भाजप च्या काही युवा नेत्यांनी कोपरगाव बंदला सामाजिक संकेत स्थळावरून विरोध केल्याने त्याचा राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांनी निषेध केला आहे.

तीन नवे कृषी कायदे रद्द करावे यासाठी देशभरातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसले आहेत.या कायद्यामुळे अगोदरच अडचणीत असलेला शेतकरी देशोधडीला लागणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये या कायद्याबाबत प्रचंड असंतोष पसरला असून देशातील सर्वच शेतकरी संघटना,सामाजिक संघटना व विरोधी पक्षांनी देखील या शेतकरी आंदोलनाला आपला पाठींबा दिला आहे.या अन्यायकारी कायद्यामुळे शेतकरी उध्वस्त होऊन त्याची झळ प्रत्येक शेतकऱ्याला बसणार असल्यामुळे शेतकरी रस्त्यावर उतरले आहे.करण्यात आलेले कृषी कायदे जुल्मी असून शेतकऱ्यांना हे कायदे मान्य नाहीत.या कायद्याच्या विरोधात न्यायालयात न्याय मागण्याची तरतूद नाही.त्यामुळे अशा अन्यायकारक कायद्यांना विरोध करून जोपर्यंत हे जाचक कायदे मागे घेतले जात नाही तोपर्यंत माघार घ्यायची नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.१२ दिवसांपासून आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांना पाठींबा देण्यासाठी कोपरगाव येथे महात्मा गांधी पुतळ्याजवळ आ.काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विरोधी पक्षांच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात येऊन तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक पद्माकांत कुदळे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी,शहराध्यक्ष सुनील गंगूले,युवक तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर,युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी,महिला शहराध्यक्ष प्रतिभा शिलेदार, युवती शहराध्यक्ष माधवी वाकचौरे,राष्ट्रीय युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष तुषार पोटे,शहराध्यक्ष सुनील साळुंके,युवक शहराध्यक्ष अक्षय आंग्रे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक पद्माकांत कुदळे,अशोक काळे,बाळासाहेब बारहाते,विठ्ठलराव आसने,अशोक तिरसे,हरिभाऊ शिंदे,कारभारी आगवन,जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते,पंचायत समिती सदस्य अनिल कदम,श्रावण आसने,मधुकर टेके,नगरसेवक गटनेते वीरेन बोरावके,मंदार पहाडे,संदीप पगारे,अजीज शेख,सर्व सेलचे अध्यक्ष,पदाधिकारी,कार्यकर्ते व शेतकरी व सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close