कोपरगाव तालुका
उपपदार्थ निर्मितीतील हिस्सा शेतकऱ्यांना मिळायला हवा-रघुनाथ दादा पाटील
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यातील सहकारी साखर कारखाने ऊस उत्पादकांना उसाचा दरही पुरेपूर देत नाही उपपदार्थ निर्मितीतील छदामही दाखवत नाही ही परिस्थिती बदलायला हवी तरच राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी नुकतेच कोपरगाव तालुक्यातील बोलकी येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
१९८० पूर्वी एक तोळा सोने बरोबर तीन टन ऊस होता.पाच क्विंटल धान्य बरोबर एक तोळा सोने होते.एक क्विंटल कापूस किंवा हळद बरोबर एक तोळा सोने बरोबर होते.तर डिझल प्रती लिटर १.५० रुपये होते.पेट्रोल ०.८० पैसे होता.त्यावेळी शेतकरी आत्महत्या करत नव्हते असेही निदर्शनास आणले.आज त्या तुलनेत भाव शेतकऱ्याला मिळायला हवा-कालिदास आपेट, कार्याध्यक्ष शेतकरी संघटना.
शेतकरी आत्महत्यांचा कलंक पुसण्यासाठी शेतकरी संघटनेने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त २८ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर या दरम्यान राज्यात जनप्रबोधन यात्रेचे आयोजन केले असून त्या निमित्त त्यांचा आज कोपरगाव तालुक्यातील बोलकी या गावी दौऱ्याचे आयोजन शेतकरी संघटनेच्या कोपरगाव तालुका शाखेने आयोजित केले होते त्यावेळी ते उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
सदर प्रसंगी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट,नगर जिल्हा अध्यक्ष अशोक पठारे,जिल्हा संघटक शिवाजी जवरे,जिल्हा संघटक युवराज जगताप,हरिप्पा तुवर,विलास कदम,कोपरगाव तालुका अध्यक्ष अजय महाले आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”पश्चिम महाराष्ट्रातील ऊस हे शेतकऱ्यांचे प्रमुख पीक आहे.मात्र या पिकाला वर्षभर सांभाळूनही सहकारी साखर कारखानदार भाव देत नाही हि शोकांतिका आहे.एफ.आर.पी.च्या चर्चा सुरु आहे.पण सी.रंगराजन समितिच्या शिफारशीनुसार साखर कारखान्यात तयार होणाऱ्या साखर,बगॅस,मोलॅसीस,प्रेसमड,यांच्या विक्रीतून येणाऱ्या रकमेतून येणाऱ्या रकमेतून सत्तर टक्के रक्कम शेतकऱ्याला मिळायला हवा.तर उपपदार्थ तयार करणाऱ्या कारखान्यांनी या रकमेतून ७५ टक्के रक्क्म मिळायला हवी अंतर तसे होत नाही.यासाठी ऊस दर नियंत्रण समिती स्थापन केली आहे.या समितीचे अध्यक्ष राज्याचे सचिव आहे.कृषी,अर्थ,सहकार सचिव व साखर आयुक्त असे पाच आय.ए.एस.अधिकारी या समितीत आहेत.पाच साखर कारखान्याचे प्रतिनिधी,पाच शेतकरी प्रतिनिधी अशी समितीची रचना आहे.मात्र गेली दोन वर्ष या समीतीची बैठकच नाही.त्यामुळे ऊस उत्पादकांना एक हजार रुपये कमी मिळत आहेत.एफ.आर.पी.चौदा दिवसात एक रकमी मिळाली पाहिजे.हि कमीत कमी रक्कम आहे.ऊस उपपदार्थ निर्मितीचा वाटा शेतकऱ्याला मिळायलाच हवा या यासाठी हि जनप्रबोधन यात्रा असल्याचेही त्यांनी सांगितलें आहे.तसेच रंगराजन समितीच्या शिफारशी नुसार दोन कारखान्याचे पंचवीस कि.मी.च्या अंतराची अट रद्द करायला हवी.शेतकऱ्याकडून राज्य व केंद्र सरकार प्रति टन ०४ हजार रुपयांचा जबर कर आकारत आहे.हे कर कमी झाले तरी शेतकऱ्याला प्रतिटन ०५ हजार रुपयांचा दर मिळू शकतो.खुली स्पर्धा झाल्याशिवाय शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही व आत्महत्या थांबणार नाही असेही त्यांनी शेवटी म्हटले आहे.
सदर प्रसंगी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांनी शेतकऱ्यांना वीज बिल भरू नका,बँकांचे कर्ज भरू नका असे आवाहन केले आहे.व त्यांची सोदोहारण कारण मीमांसा केली आहे.१९८० पर्यंत शेतकरी नुकसान सहन करू शकत होता.मात्र त्यानंतर त्याची क्षमता संपली आहे.दररोज राज्यात १२-१३ ते केंद्रात ४०-४५ शेतकरी आत्महत्या होत आहे.त्यावेळी एक तोळा सोने बरोबर तीन टन ऊस होता.पाच क्विंटल धान्य बरोबर एक तोळा सोने होते.एक क्विंटल कापूस किंवा हळद बरोबर एक तोळा सोने बरोबर होते.तर डिझल प्रती लिटर १.५० रुपये होते.पेट्रोल ०.८० पैसे होता.त्यावेळी शेतकरी आत्महत्या करत नव्हते असेही निदर्शनास आणले.आज त्या तुलनेत भाव शेतकऱ्याला मिळायला हवा अशी मागणी केली आहे.सरकारने कर्जमाफी सर्वांना केली नाही.तर कर्ज भरणाऱ्यांना पन्नास हजार रुपये देणार होते मात्र त्याकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे.असेही ते शेवटी म्हणाले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्तविक शेतकरी संघटनेचे जिल्हाप्रमुख अशोक पठारे यांनी केले तर सुत्रसंचलन विलास कदम यांनी केले तर आभार नूतन तालुका अध्यक्ष अजय महाले यांनी केले आहे.