कोपरगाव तालुका
..हे शेतकरी संघटनेचे नेते सोमवारी कोपरगावात !
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
महात्मा ज्योतिबा फुले जयंती व हुतात्मा बाबू गेनू या क्रांतिकारकांच्या स्मृतिदिना निमित्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांची जनप्रबोधन यात्रा दिनांक २८ नोव्हेम्बर पासून सुरु झाली असून ती दि.१२ डिसेंम्बर पर्यंत सुरु राहणार ती कोपरगावात सोमवार दि.०७ डिसेंम्बर रोजी बोलकी गावात येणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अशोक पठारे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा कलंक पुसण्यासाठी सर्व शेतकरी कर्ज व वीज बिलातून मुक्त करा दोन कारखान्या मधील अंतर मुक्त करावे,शेतकऱ्यांना बाजाराचे व तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य दयावे, शेती विरोधी कायदे रद्द करावे,गाईच्या दुधाला ४० रुपये म्हशीच्या दुधाला ६० रुपये दर मिळावा,उसाला एक रकमी एफ.आर.पी.व अंतिम भाव चार हजार रुपये मिळावा आदी मागण्या या निमित्ताने करण्यात येणार आहे-अड्.अजित काळे,प्रदेशाध्यक्ष युवा आघाडी.
दिनांक ०६ डिसेंम्बर रोजी तुकड ओढा तालुका नगर येथे सभा जनप्रबोधन करणार आहे व त्यानंतर दुपारी दोन वाजता शासकीय विश्रामगृह नगर येथे पत्रकार परिषद होणार आहे.दुसऱ्या दिवशी दिनांक ०७ डिसेंम्बर रोजी बोलकी तालुका कोपरगाव येथे सकाळी दहा वाजता जनप्रबोधन सभा करून दुपारी १२.३० वाजता कोपरगाव येथे पत्रकार परिषद होणार आहे.शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा कलंक पुसण्यासाठी सर्व शेतकरी कर्ज व वीज बिलातून मुक्त करा दोन कारखान्या मधील अंतर मुक्त करावे,शेतकऱ्यांना बाजाराचे व तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य दयावे, शेती विरोधी कायदे रद्द करावे,गाईच्या दुधाला ४० रुपये म्हशीच्या दुधाला ६० रुपये दर मिळावा,उसाला एक रकमी एफ.आर.पी.व अंतिम भाव चार हजार रुपये मिळावा आदी मागण्या या निमित्ताने करण्यात येणार आहे.त्या मागण्या पूर्ण होण्यासाठी जनप्रबोधन यात्रा नगर जिल्ह्यात येणार आहे.या दौऱ्यात युवा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अड्.अजित काळे हे हि उपस्थित राहणार आहे.तरी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच योगेश महाले यांनी शेवटी केले आहे.या दौऱ्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील हे शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांचे विचार कृतीत आणणारे नेते म्हणून राज्यभर ओळखले जातात.त्यामुळे या दौऱ्याकडे नगर जिल्ह्यसह कोपरगाव,राहाता तालुक्याचे लक्ष लागून आहे.