कोपरगाव तालुका
“एक गाव एक दिवस” अभियानास सुरुवात
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
महाराज्य राज्य विद्युत वितरण कंपनीने वीजग्राहकांना दर्जेदार व सुरळीत वीज पुरवठा होण्यासाठी एक गाव,एक दिवस हे अभियान सुरु केले असून या अभियानाच्या माध्यमातून वीज ग्राहकांच्या अडचणी तातडीने सुटल्या जाऊन ग्राहकांच्या तक्रारीचे तात्काळ निरसन होत असल्यामुळे एक गाव,एक दिवस अभियान वीज ग्राहकांसाठी राबविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कोपरगाव पंचायत समितीच्या सभापती पोर्णिमा जगधने यांनी दिली आहे.
महावितरणचे अधिकारी व कर्मचारी वीज ग्राहकांना अचूक वीज देयके देऊन त्या वीज देयकांचा नियमित भरणा करणे,नवीन वीजजोडणी,तसेच वीज ग्राहकांना पायाभूत सुविधा या माध्यमातून मिळणार आहे.महावितरणच्या सेवा अधिक प्रभावीपणे राबविले जाऊन ग्राहकांना याचा निश्चित फायदा होणार आहे-पूर्णिमा जगधने सभापती कोपरगाव पंचायत समिती.
कोपरगाव विधानसभा मतदार संघात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने मुर्शतपूर,धोत्रे,पुणतांबा या ठिकाणी एक गाव,एक दिवस अभियानास प्रारंभ करण्यात आला.याप्रसंगी पोर्णिमा जगधने बोलत होत्या.त्या म्हणाल्या की,”मागील काही वर्षापासून वीज वितरण कंपनीबाबत वीज ग्राहकांच्या अनेक तक्रारी होत्या.आ.आशुतोष काळे यांनी उर्जा मंत्री ना.नितीन राऊत व उर्जा राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांची भेट घेवून त्यांचे शेतकऱ्यांच्या व वीज ग्राहकांच्या अडचणीकडे लक्ष वेधले होते.आ. काळे यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून वीज ग्राहकांच्या अनेक समस्या ऐकून घेतल्या आहे. उर्जा खात्याने सुरु केलेल्या या उपक्रमाद्वारे ज्या वीजग्राहकांच्या काही अडचणी किंवा तक्रारी असतील तर या तक्रारीचे निवारण प्रत्यक्ष गावात जावून केले जाणार आहे. त्यामुळे हे अभियान वीज ग्राहकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
महावितरणचे अधिकारी व कर्मचारी वीज ग्राहकांना अचूक वीज देयके देऊन त्या वीज देयकांचा नियमित भरणा करणे,नवीन वीजजोडणी,तसेच वीज ग्राहकांना पायाभूत सुविधा या माध्यमातून मिळणार आहे.महावितरणच्या सेवा अधिक प्रभावीपणे राबविले जाऊन ग्राहकांना याचा निश्चित फायदा होणार असल्याचे सभापती जगधने यांनी म्हटले आहे.या अभियानाच्या माध्यमातून पहिल्याच दिवशी पुणतांबा येथे महावितरण वीज देयक वसुली मोठ्या प्रमाणात झाली असून पुणतांबा येथे १०८ वीज ग्राहकांनी एक लाखाच्या वर आपली थकबाकी जमा केली आहे.यावेळी वीज ग्राहकांच्या वीज पुरवठ्याबाबत असलेल्या अडचणी व वीज देयक दुरुस्ती तात्काळ करण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,जिनिंग प्रेसिंगचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,प.स.सदस्य मधुकर टेके,मुर्शतपुरच्या सरपंच साधना दवंगे,उपसरपंच मनिषा गिरमे,धोत्रेचे उपसरपंच तालिब शेख,गणेश घाटे,राजेंद्र माळवदे,आण्णासाहेब जामदार,सुरेखा मोरे, प्रविण गुंजाळ,रंजना बारावकर,सिताराम तिपायले,विष्णु शिंदे,पुणतांब्याचे माजी सरपंच मुरलीधर थोरात,दत्तात्रय धनवटे,अजय जोशी,किरण नाईक, दादासाहेब वहाडणे,संजय धनवटे,जालिंदर इंगळे राहाता महावितरणचे उपकार्यकारी अभियंता डी.डी.पाटील,सहाय्यक अभियंता शीतलकुमार जाधव, तसेच राहाता विभागातील सर्व सहाय्यक अभियंते,तंत्रज्ञ,वीज तंत्री. तार तंत्री,बिलिंग विभागाचे सर्व अधिकारी,अतिरिक्त कार्यकारी अभियंता भगवंत खराटे,सहाय्यक अभियंता प्रसाद पांडे आदि उपस्थित होते.