जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात अवैध पाणी जार केंद्रावर धाडी,

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात अवैधपणे सुरु असलेल्या पाच पाणी जार केंद्रांना नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय हरित लवाद व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचे आदेशानुसार आज अचानक धाड टाकून ते सीलबंद करण्याची कारवाई केल्याने अवैध पाणी शुद्धीकेंद्र चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.दरम्यान या पुढेही हि कारवाई सुरूच राहिल असा इशारा कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

राष्ट्रीय हरित लवाद व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना अवैध शुद्ध पाणी पुरवठा करण्याच्या नावाखाली सुरु असलेले पाण्याचे प्रकल्प बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची ना हरकत किंवा परवानगी असल्याशिवाय असे प्रकल्प सुरु ठेवण्यास या नियमानुसार बंदी आणली गेली आहे.हि कारवाई केली आहे.

राष्ट्रीय हरित लवाद व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना अवैध शुद्ध पाणी पुरवठा करण्याच्या नावाखाली सुरु असलेले पाण्याचे प्रकल्प बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची ना हरकत किंवा परवानगी असल्याशिवाय असे प्रकल्प सुरु ठेवण्यास या नियमानुसार बंदी आणली गेली असून असे प्रकल्प असल्यास त्यांना त्वरित सील करण्यास सांगण्यात आले आहे.या संबंधी हरित लावादात एक प्रकरण दाखल झालेले असून जलप्रदूषण अधिनियम-१९७४ व वायू प्रदूषण अधिनियम-१९८१ अन्वये पिण्याचे थंड पाणी जार मधून विक्री करणे या उद्योगा संदर्भात उपोरोक्त याचिका क्रं.७५-२०१७ दाखल केलेली असून विनापरवाना असे सुरु असलेले युनिट अथवा प्रकल्प तत्काळ सील करणे व कारवाई अहवाल सादर करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवाद यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांना दि.२६ ऑक्टोबर २०२० रोजी दिला आहे.हि कारवाई तीन दिवसात करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश स्थानिक स्वराज्य संस्थांना दिल्याने कोपरगाव नगरपरिषदेने पाच केंद्र चालकांवर हि कारवाई केली आहे.

हि कारवाई कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे,वसुली विभागप्रमुख श्वेता शिंदे,पाणी पुरवठा विभाग प्रमुख ऋतुजा पाटील,मार्केट विभाग प्रमुख योगेश्वर खैरे,विद्युत विभाग प्रमुख रोहित सोनवणे,प्रभारी स्वच्छता विभाग प्रमुख सुनील आरणे, राजेश गाढे,भाऊराव वायखिंडे व अन्य अधिकारी व कर्मचारी आदींनीं केली आहे.त्यामुळे अवैध पाणी पुरवठा करणाऱ्यांत खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close