कोपरगाव तालुका
बड्या मॉल मुळे छोट्या व्यापाऱ्यांत खळबळ !
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नजीक शिर्डी येथे रिलायन्स कंपनीचा मोठा मॉल सुरु झाल्याने व त्याच्याकडे सामान्य ग्राहक व व्यापारी आकृष्ठ झाल्याने कोपरगाव व परिसरातील व्यापाऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली असून त्यांनी हे मॉल दहा लाखांच्या पुढे लोकसंख्या असलेल्या शहरात सुरु ठेवावे अशी मागणी करून शिर्डी,राहाता,कोपरगाव येथील व्यापाऱ्यांनी त्यास विरोध केल्याची बाब नुकतीच उघड झाली आहे.
छोट्या व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन या बड्या कंपन्यांना विरुद्ध करण्याची गरज निर्माण झाली आहे.ओला,ओबेर या कंपन्यांच्या धर्तीवर ग्रामीण भागातील रिक्षा व्यवस्था हि मंडळी उध्वस्त करून टाकतील व रासायनिक शेतमाल ग्राहकांच्या माथी मारण्याचा धोका आहे-ओमप्रकाश कोयटे,अध्यक्ष,कोपरगाव व्यापारी महासंघ.
रिटेल क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्याच्या निर्णयामुळे अनेक बड्या जागतिक कंपन्यांना भारताची दारे खुली झाली आहेत.मोठी मल्टीब्रँड दुकाने किमान दहा लाख लोकसंख्येच्या शहरांत उघडता येणार आहेत.याचाच अर्थ नगर सारख्या शहरात असे मॉल्स सुरू होऊ शकतात.या मॉल्सचा छोट्या व्यावसायिकांवर परिणाम होईल अशी ओरड होत असली तरी नाशिक,औरंगाबादेतील छोटे व्यावसायिक आणि दुकानदार मात्र निर्धास्त असतानाचे चित्र असताना कोपरगाव राहाता शिर्डी येथील किरकोळ व्यापाऱ्यांनी मात्र या बड्या कंपन्यांच्या मॉलची धास्ती घेतल्याचे उघड झाले आहे.याबाबत नुकतीच कोपरगाव व्यापारी महासंघाने समता पतसंस्थेच्या हॉल मध्ये एक बैठक आयोजित केली होती.त्यावेळी हि बाब उघड झाली आहे.बैठकीच्या अध्यक्षस्थानी समता पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे हे होते.
सदर प्रसंगी व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष नारायण अग्रवाल,सचिव सुधीर डागा,माजी जिल्हा अपरिषद सदस्य केशव भवर,भाजप संगमनेर व्यापारी महासंघाचे प्रमुख शिरीष मुळे,शिर्डी व्यापारी महासंघाचे श्री लोढा,राहता येथील चुग,धाडीवाल,नगरसेवक सत्येन मुंदडा,मंदार पहाडे,नरेंद्र कुर्लेकर,राम थोरे, किरण शिरोडे,आदी प्रमूख व्यापारी कार्यकर्ते व व्यापारी बहुसंख्येने उपस्थित होते.
२००५ मध्ये आलेल्या स्पेन्सर्स मॉलमुळे शहरात मॉल संस्कृतीची पाळेमुळे रोवण्यास सुरुवात झाली.त्यानंतर रिलायन्स,डी.मार्ट,वॉल मार्ट,विशाल मेगामार्ट,बिग बझार आणि मोरबरोबरच आशियातील सर्वात मोठा प्रोझोन हे मॉल अन्य शहरात दाखल झाले.त्यापैकी रिलायन्स हे काही महिन्यांपूर्वीच शिर्डी,राहाता,कोपरगाव व नजीकच्या व्यापाऱ्यांना यांना माल पुरवणारे दालन शिर्डी येथे सुरू झाले आहे.पण या मॉलचा मोठा फटका बसला असल्याचे किरकोळ व्यापारी आणि किराणा दुकानदारांनी यावेळी सांगितले आहे.जरी आंतरराष्ट्रीय मॉल शहरात आले तरी तीस टक्के खरेदी ही लघु व मध्यम उद्योगांकडून करणे या मॉलना बंधनकारक आहे.मात्र हे नियम या कंपन्या पाळत नाही असा आरोप करण्यात आला आहे.
सदर प्रसंगी व्यापारी महासंघाचे सचिव सुधीर डागा म्हणाले की,”या बड्या कंपन्यांचे मॉल हे दहा लाख लोकसंख्येच्या पुढे लोकसंख्या असलेल्या शहरात सुरु करण्याचे सरकारचे धोरण असताना शिर्डी सारख्या ग्रामीण भागात हे कसे सुरु झाले आहे हे मोठे आश्चर्य आहे.हे मॉल वाजवीपेक्षा जास्त दर आकारून ग्राहकांची लूट करता आहेत.त्यामुळे किरकोळ व्यापाऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.प्रचंड भांडवल क्षमता,व जाहिरातींचा मारा या जोरावर हे ग्रामीण अर्थचक्र कोलमडून टाकण्याची शक्यता असल्याचे बोलून दाखवली आहे.त्यानी आता कापसाच्या वाती,कपबशा, झाडू,भांडी,अगरबत्ती,कपूर आदी किरकोळ वस्तू विकून या छोटा व्यापाराची बाजार पेठ उध्वस्त करून टाकतील अशी भीती व्यक्त केली आहे.यावेळी केशव भवर,नारायण अग्रवाल,किरण शिरोडे,मंदार पहाडे आदींनी आपले विचार व्यक्त केले आहे.