कोपरगाव तालुका
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत अवैध बदल,आंदोलन सुरु
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील सांगवी भुसार ग्रामपंचायत हद्दीतील मंजूर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील मंजूर रस्ता मार्ग परस्पर बदलून अन्यत्र वळविण्यात आल्याच्या निषेधार्थ आज पासून सांगवी भुसार ग्रामस्थ व प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने आज पासून तालुका अध्यक्ष संदीप क्षीरसागर यांचे नेतृत्वाखाली ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
आज सायंकाळी उशिराने पंतप्रधान सडक योजनेचे सहाय्यक अभियंता महेश मते हे भेटीसाठी आले होते.मात्र ग्रामस्थांनी हे आंदोलन मागे घेण्यास नकार दिला असल्याची माहिती प्रहार जनशक्तीचे तालुकाध्यक्ष संदीप क्षीरसागर यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
राज्यातील वाड्या-वस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ करण्यासह सध्या असलेल्या रस्त्यांचा दर्जा वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात कामे करणे आवश्यक असल्याने प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्याधर्तीवर राज्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजना राबविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत बुधवारी घेण्यात आला. या योजनेंतर्गत राज्यातील तीस हजार किमी रस्त्यांच्या दर्जा वाढीसाठी १३ हजार ५०० कोटी तर ७३० किमीच्या नवीन रस्त्यांच्या जोडणीसाठी ३२८ कोटी असा एकूण १३ हजार ८२८ कोटी खर्च अपेक्षित आहे.ही योजना ग्रामविकास विभागाच्या महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेमार्फत राबविण्यात येत आहे.सध्याच्या रस्त्यांचा दर्जा वाढविण्यासाठी ३० हजार किमी लांबीच्या रस्त्यांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून,पहिल्या टप्प्यात दोन हजार किमी लांबीच्या रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत.पुढील चार वर्षांत उर्वरित रस्त्यांच्या दर्जावाढीची कामे विविध टप्प्यात केली जाणार असून, त्यासाठी १३ हजार ५०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.तसेच राज्यातील ७३० किमीच्या नवीन रस्त्यांची जोडणी करण्यात येणार असून,त्यासाठी ३२८ कोटी खर्च येणार आहे.कोपरगाव तालुक्यातही या योजनेअंतर्गत सांगवी भुसार ग्रामपंचायत हद्दीत दि.०२ फेब्रुवारी २०१९ चे आदेशाप्रमाणे ग्रामीण मार्ग क्रं.६४ मंजूर करण्यात आला आहे.मात्र या मार्गात ग्रामस्थांना विश्वासात न घेता स्थानिक नेत्यांनी या रस्त्यांचा मार्ग आपल्या सोयीसाठी परस्पर वळविण्यात आला आहे.व त्याचे शुद्धीपत्रक परस्पर प्रसिद्ध केल्याचा आरोप केला आहे.त्यामुळे सांगवी भुसार मधील अन्य ग्रामस्थावर अन्याय होत असल्याची भावना ग्रामस्थांत निर्माण झाली आहे.त्यामुळें याबाबत ग्रामस्थांनी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही उपयोग झाला नाही.त्यामुळे ग्रामस्थांत अच्छा-खांसा रोष आहे.त्यामुळे त्यांनी या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी केली आहे.व तो अपर्यंत काम बंद ठेवावे अशी मागणी केली आहे.या बाबत त्यांनी आज सकाळी अकरा वाजता ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.या पूर्वी दिलेल्या निवेदनावर जवळपास २६० ग्रामस्थांनी सह्या केल्या आहेत.आज उशिरा नगर येथील पंतप्रधान सडक योजनेचे सहाय्यक अभियंता या आंदोलन कर्त्यांची भेट घेण्यासाठी हजर झाले होते.मात्र आंदोलन मागे घेण्यास कार्यकर्त्यांनी नकार दिला आहे.त्यामुळे अधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे.