कोपरगाव तालुका
लोहगाव परिसरात चोऱ्या वाढल्या,ग्रामस्थांत चिंता
जनशक्ती न्यूजसेवा
लोहगाव (वार्ताहर)
राहता तालुक्यातील लोहगाव परिसरात मोठ्या प्रमाणात मोठ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे नागरिकांमध्ये रात्र जागून काढावी लागत आहे.गेली दोन दिवसापासून परिसरात वाड्या वस्त्यावर नागरिकांमध्ये चोरांच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
लोहगाव परिसरात दिवसाढवळ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे.रात्र रात्री बारा नंतर नागरिकांना फोन च्या साह्याने एकमेकांमधील जागे राहण्याची सांगण्यात येते. या परिसरात मागील दीड वर्षांपूर्वी अशाच प्रकारे चोऱ्या झाले होते परंतु त्याचा तपास मात्र लागला नाही हि बाब चिंता निर्माण करणारी आहे.
त्यामुळे आता ऐन दिवाळी तोंडावर पुन्हा एकदा घर फोडीचा प्रकार झाली असून त्यात पाच घरांची घरफोडी झाली आहे.मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार झाला त्यामुळे सोनी चांदी रोख रक्कम असा ऐवज चोरांनी चोरून नेला आहे.याबाबत लोणी पोलिस स्टेशनला विजय देविदास ननवरे,निलेश धीरज चरांवडे, महेश राजू कदम,मंगल दादा कदम यांनी घरातील सोने-चांदी रोख रक्कम चोरून पोबारा केला आहे.पोलिसांनी अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.चोरांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी श्वान पथकाचा वापर केला आहे.दिवसभर या चोरा विषयी पोलीस संबंधितांना विचारपूस करत होते. गावातील स्थानिक कार्यकर्ते पोलिसांना सहकार्य करत होते. चोरी झाल्यावर घरी जाऊन स्थानिक कार्यकर्ते धीर देत होते,पोलिसांना तपास लवकर लावतील असा आशावाद नागरिकांमध्ये निर्माण केला गेला आहे.परंतु मागील इतिहास पाहता आतापर्यंत झालेल्या चोरांचा चोरांचा तपास पोलिस यंत्रणा लावू शकली नाही.घटना घडून गेली की दोन-तीन दिवस या गोष्टीवर चर्चा होते. त्यानंतर नागरिकही ना विसर पडतो आणि पोलिसही या गोष्टीचा गांभीर्याने दखल घेत नाही हे दुष्टचक्र संपणार कधी असा सवाल नागरीकांनी केला आहे. काही दिवसांपासून होत असलेल्या चोऱ्यांचा पोलीस प्रशासन तपासणी लावू शकले नाही. त्यामुळे अशा भुरट्या चोऱ्यांचे मनोधैर्य वाढले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.संबंधित पोलिस प्रमुख आणि संबंधित पोलिस स्टेशन अशा त्यांचा तपास लावून नागरिकांना मध्ये मनोधर्य निर्माण केले पाहिजे.पोलिसांनी कर्तव्य बजावले पाहिजे परंतु अशा प्रकारे कुठलीही कार्यवाही होत नसल्यामुळे नागरिकांनीं कोणावर विश्वास ठेवावा असा प्रश्न निर्माण झालेला आहे.