कोपरगाव तालुका
कोपरगावात ‘विश्व हिंदी दिन’उत्साहात साजरा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नजीक असलेल्या के.जे.सोमैया वरिष्ठ व के.बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात हिंदी विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष विभागाच्या वतीने दि.१३ ते १५ जानेवारी दरम्यान विश्व हिंदी दिनाचे औचित्य साधुन तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी १० जानेवारीला विश्व हिंदी दिवस साजरा करण्यास सुरुवात केली होती. तेव्हापासून प्रत्येक वर्षी १० जानेवारीला विश्व हिंदी दिवस साजरा केला जातो. तर भारतात १४ सप्टेंबरला हिंदी दिवस साजरा करण्यात येतो.कोपरगावात सोमय्यां महाविद्यालयात विश्व हिंदी दिन साजरा करण्यात आला आहे.
प्रत्येक दिवशी १० जानेवारीला जागतिक स्तरावर विश्व हिंदी दिवस साजरा केला जातो. या दिवशी जगभरात हिंदी भाषेच्या प्रचारासह ती आंतरराष्ट्रीय भाषेच्या स्तरावर पोहचवणे यामागील उद्देश आहे. याच खास दिवसानिमित्त परराष्ट्र मंत्रालयाकडून विशेष कार्यक्रमाद्वारे आयोजन केले जाते. हिंदीच्या प्रचाराचे काम करतात. खरंतर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी १० जानेवारीला विश्व हिंदी दिवस साजरा करण्यास सुरुवात केली होती. तेव्हापासून प्रत्येक वर्षी १० जानेवारीला विश्व हिंदी दिवस साजरा केला जातो. तर भारतात १४ सप्टेंबरला हिंदी दिवस साजरा करण्यात येतो.
या व्याख्यानमालेत डॉ.गोकुळ क्षीरसागर (शेवगाव),डॉ. शरद शिरोळे (संगमनेर) व प्रा.अशोक घोरपडे (अहमदनगर) ह्या तज्ञ मार्गदर्शकांना आमंत्रित करण्यात आले.डॉ.गोकुळ क्षीरसागर यांनी ‘पटकथा लेखन स्वरूप व संभावना‘ या विषयावर बोलतांना सिनेमा निर्मिती मध्ये पटकथा लेखन,संवाद,अभिनय कौशल्य इत्यादी बाबी नमूद केल्या.
डॉ. शरद शिरोळे यांनी
‘हिंदी भाषेतील रोजगाराच्या संधी‘ या विषयवार बोलतांना साहित्य,मीडिया,प्रशासन,पत्रकारिता,विविध स्पर्धापरीक्षा यामध्ये हिंदी भाषेतील योगदान व रोजगारनिर्मिती यावर मौलिक मार्गदर्शन केले आहे.
प्रा.अशोक घोरपडे यांनी
‘हिंदी पत्रकारिता‘ या विषयावर बोलतांना सदयस्थितीतील पत्रकारितेची भूमिका व महत्व विशद करतांनाच विद्यार्थ्यांनी पत्रकारिता या क्षेत्राकडे समाजहिताच्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे असे सांगितले.
या व्याख्यानमालेचे उद्घाटन कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे यांच्या हस्ते संपन्न झाले.या व्याख्यानमालेसाठी विश्वस्त संदिपराव रोहमारे
,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव,आय.क्यू.ए.सी.समन्वयक प्रा.विजय ठाणगे,कार्यालयीन अधिक्षक डॉ.अभिजीत नाईकवाडे हे उपस्थित होते.या व्याख्यानमालेचे आयोजन हिंदी विभागप्रमुख डॉ.संजय दवंगे,अनुसंधान केंद्र समन्वयक प्रो.जिभाऊ मोरे,प्रा.निलेश गायकवाड यांनी केले आहे. या ऑनलाईन व्याख्यानमालेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.