कोपरगाव तालुका
कोपरगावात एका इसमाचे निधन
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील धारण गाव रस्त्यावर माधव बागेजवळ डॉ.गोंधळी यांचे दवाखान्यासमोर एक पुरुष जातीचे प्रेत (वय-३८-४० वर्ष) आज सकाळी सहा वाजेच्या पूर्वी आढळून आल्याने कोपरगाव शहरात खळबळ उडाली आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी खबर देणार अर्जुन रघुनाथ मोरे वय-३६ रा.सुभाषनगर यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,खबर देणार हे आपल्या कामानिमित्त धारणगाव रस्त्यावरून जात असताना त्याना सकाळी सहा वाजेच्या पूर्वी एक पुरुष जातीचे प्रेत आढळून आले आहे.त्यांनी या बाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात या बाबत खबर दिली आहे.
कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू नोंदणी पुस्तक क्रं.सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.एस.जी.गायमुखे हे करीत आहेत.