कोपरगाव तालुका
कारखान्यांनी भाग विकास निधीतून रस्त्यावर मुरूम टाकावा-मागणी
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
या वर्षी झालेल्या प्रचंड पावसाने तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून तालुक्यातील साखर कारखान्यांनी भाग विकास निधीतून रस्त्यावर मुरूम टाकावा अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे नुकतीच केली आहे.
साखर कारखाने सुरू झाले पण यंदा ऊस वाहतूक करणे जिकिरीचे होणार आहे पावसामुळे शेतकऱ्यांना खरीप पिके शेतातून काढता आले नाही आजही ही परिस्थिती आहे मात्र कारखाने सुरू झाल्यानंतर शेतीतून ऊस पिकाची वाहतूक कशी करता येईल ही शेतकऱ्यांपुढे समस्या आहे.
आपल्या पत्रकात पोळ यांनी पुढे म्हटले की, कोपरगाव तालुक्यासह जिल्ह्यातील बहुसंख्य साखर कारखान्याचे बॉयलर प्रदीपन झाले आहे. पावसामुळे ग्रामीण रस्त्यांची दुरवस्था झाली आहे ,कारखाने सुरू झाले पण यंदा ऊस वाहतूक करणे जिकिरीचे होणार आहे पावसामुळे शेतकऱ्यांना खरीप पिके शेतातून काढता आले नाही आजही ही परिस्थिती आहे मात्र कारखाने सुरू झाल्यानंतर शेतीतून ऊस पिकाची वाहतूक कशी करता येईल ही शेतकऱ्यांपुढे समस्या आहे. शेतकऱ्याच्या ऊस पिकातून प्रति टन मुख्यमंत्री मंत्री निधी व भाग विकास निधी अशी विशिष्ट रक्कम कपात होत असते तालुक्यातून दोन्ही साखर कारखान्याच्या माध्यमातून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा महसूल शासनाला जात असतो मात्र त्या प्रमाणात तालुक्याच्या वाट्याला निधी उपलब्ध होत नाही पूर्वी कारखान्याच्या यंत्रणे कडून ग्रामीण भागातील रस्त्यावर मुरूम टाकून खड्डे बुजवले जायचे मात्र काही वर्षापासून अशा प्रकारे खड्डे बुजवले जात नाही त्यामुळे या वर्षी रस्त्यामुळे ऊस कारखान्यापर्यंत पोहचविणे अवघड होईल आणि रस्त्याच्या अडचणी मुळे कारखाने देखील शेतकऱ्यांची अडवणूक करून तुम्हीच कारखान्यापर्यंत ऊस आणून घाला अशी अडवणूक करण्याची शक्यता आहे असे झाल्यास ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत येईल त्यामुळे दोन्ही कारखान्यांनी आपली यंत्रणा उपलब्ध करून ग्रामीण रस्त्यावर मुरूम टाकून खड्डे बुजवावे असे आवाहनही या पत्रकाद्वारे पोळ यांनी शेवटी केले आहे.