कोपरगाव तालुका
शहापूर सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी-पाचोरे
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील शहापूर येथील शहापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी काळे गटाचे सूर्यभान भिमाजी पाचोरे व उपाध्यक्षपदी माधव रंगनाथ सदाफळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
शहापूर सोसायटीच्या विद्यमान अध्यक्ष शोभा घारे यांनी ठरलेल्या आवर्तनानुसार नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.त्यामुळे रिक्त झालेल्या अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर करण्यात आली होती.या पदाची निवडणूक नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली आहे.यावेळी अध्यक्ष पदासाठी सूर्यभान पाचोरे व उपाध्यक्ष पदासाठी माधव सदाफळ यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची अनुक्रमे अध्यक्ष-उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक अधिकारी आर.एन.राहणे यांनी दिली आहे.
यावेळी सोसायटीचे संचालक वसंतराव पाचोरे,रामनाथ पाचोरे,वाल्मिक घारे,साहेबराव डांगे,कोंडाजी खंडीझोड,नितीन पाचोरे,आप्पा घारे,दिगंबर गोसावी, भाऊसाहेब घारे,शोभा घारे,सचिव राजेंद्र गवळी आदी मान्यवर उपस्थित होते. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे यांचे माजी आ.अशोक काळे,आ.आशुतोष काळे यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.