जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

मुद्रांक विक्रेत्यांनी वाढीव दर आकारू नये-आवाहन

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात आपल्या तहसील कार्यालयाच्या आवारात अनेक अधिकृत शासनमान्य मुद्रांक विक्रेते यांनी आपले ‘मुद्रांक व न्यायालयीन तिकीट’ विक्रीसाठी सरकारी दरापेक्षा जास्त रक्कम आकारात असल्याबाबत सेनेच्या जिल्हा कार्यालयात लेखी तक्रारी प्राप्त झाल्या असून आमच्या तालुका पदाधिकारी यांनी तहसील परिसरात स्टिंग ऑपरेशन केले असून त्यात सत्यता आढळली असल्याने त्याची तात्काळ दखल घेऊन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या नेतृत्वाखाली आज तहसीलदार यांची भेट घेऊन शिवसेनेने आज निवेदन देवुन मुद्रांक विक्रेते व पाठीशी घालणाऱ्या अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करून दोषींचे परवाने रद्द करण्याची मागणी केली आहे.

मुद्रांक हा कायदेशीर दस्तऐवजांवर लावला जाणारा कर आहे.चेक,प्राप्ती,लष्करी कमिशन,विवाह परवाने,जमीन व्यवहार, आदींवर हा कर लावला जातो. कागदपत्र कायदेशीररित्या प्रभावी होण्यासाठी आणि स्टॅंप ड्युटी भरण्यात आली आहे असे दर्शविण्याकरता कागदपत्रावर एक स्टॅंप लावण्यात येतो.

संपूर्ण जिल्ह्यात कुठल्याही तालुक्यातील तहसील कार्यालयीन आवारात मुद्रांक व न्यायालयीन तिकीटापोटी अधिक रक्कम घेतली जात नसून मात्र कोपरगाव तालुक्यातील तहसील आवारात अधिकाराचा गैरवापर करत जनतेची दिवसा लुट सुरु असल्याचे चित्र असून अनेक नागरिकांनी या बाबत तक्रारी केल्या आहेत.त्याची दखल शिवसेनेच्या ग्राहक मंचाने घेतली आहे.त्या नंतर त्यांनी हा इशारा दिला आहे.

नुकतीच कोपरगाव तालुक्यातील अनेक वृत्तपत्रांनी आपल्या दैनिकात १०० रुपयाच्या मुद्रांकासाठी १० रुपये अधिक व न्यायालयीन तिकिटासाठी २ रुपये अधिक घेऊन सर्वसामान्यांची लुट होत असलेबाबतची बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत.याची शिवसेनेने दखल घेऊन तहसील परिसरात अनेक दिवसांपासून अनाधिकृत दुकानदार मुद्रांक विक्री करत असल्याबाबत व अधिक पैसे घेत असल्याबाबत कक्ष उपतालुकाप्रमुख सतिश पवार व रोहित पवार यांनी स्टिंग ऑपरेशन केले आहे.त्यात त्यांना सत्यता आढळली आहे.त्या नंतर त्यांनी हा पवित्रा घेतला आहे.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख झावरे यांनी अधिक सांगितले कि,”शिवसेनेच्या सत्तेचा केंद्रबिंदू सामान्य जनता असून जर जनतेची फसवणूक होत असेल तर शिवसेना कदापि सहन करणार नाही.शासकीय अधिकारी यांनी कुणालाही परवाने द्यावेत परंतु अधिक पैसे आकारले जाऊ नयेत.

सदर निवेदन देतेवेळी शिवसेनेचे शहरप्रमुख कलविन्दर दडीयाल,वाहतूक सेनेचे शहरप्रमुख भरत मोरे,उपशहरप्रमुख गगन हाडा,विकास शर्मा,इरफान शेख यांच्यासह कोपरगावचे कक्ष उपजिल्हाप्रमुख सुधाकर वादे,कोपरगाव कक्ष तालुकाप्रमुख अशोक पवार,कक्ष शहरप्रमुख रवींद्र कथले,कक्ष उपतालुकाप्रमुख देविदास मोरे,कक्ष उपशहरप्रमुख राहुल देशपांडे,माधव आहेर,सतिश शिंगाने,उत्तमराव जाधव,विकास माळवे सह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व शिवसैनिक बहूसंख्येने उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close