कोपरगाव तालुका
तालुक्यातील शिवरस्त्यांची अतिक्रमणे काढा-मागणी
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील ७९ गावातील शिवरस्त्यांचा प्रश्न गंभीर असून या प्रश्नी अनेक शेतकऱ्यांनी अतिक्रमणे केलेली असून हि अतिक्रमणे हि अतिक्रमणे कृषिक्षेत्रासाठी जीवघेणी ठरत असल्याने ती तात्काळ हटवावी व ह्या शिवरस्त्यांची मोजणी करण्यात यावी अशी महत्वपूर्ण मागणी अड्.गौरव गुरसळ यांनी नुकतीच आ,काळे यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
ग्रामीण भागातील गावशिव रस्ते आणि ग्रामीण रस्ते अतिक्रमणाचा विळख्यात सापडले आहे.व हे रस्ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.या बाबत अनेकदा तक्रारी करूनही शासन याकडे दुर्लक्ष करते.या रस्त्यांचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.तालुक्यातील महसूल आणि भूमी अभिलेख विभागाने या रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे.मात्र या विभागाने त्याकडे सोयीस्कर कानाडोळा केल्याने हा प्रश्न गंभीर रूप घेऊन उभा आहे-अड्.गौरव गुरसळ
ग्रामीण भागातील गावशिव रस्ते आणि ग्रामीण रस्ते अतिक्रमणाचा विळख्यात सापडले आहे.व हे रस्ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.या बाबत अनेकदा तक्रारी करूनही शासन याकडे दुर्लक्ष करते.या रस्त्यांचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.तालुक्यातील महसूल आणि भूमी अभिलेख विभागाने या रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे.मात्र या विभागाने त्याकडे सोयीस्कर कानाडोळा केल्याने हा प्रश्न गंभीर रूप घेऊन उभा आहे.त्यामुळे पावसाळ्यात शेतीमाल काढणे हि बाब शेतकऱ्यांसाठी मोठी जिकरीची बनते.त्यातून अनेक तंटे-बखेडे उभे राहात आहेत व त्यातून शेतकऱ्यांच्या पैशाचा अपव्यय होत आहे.त्यामुळे भूमी अभिलेख आणि महसूल विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.मात्र हा विभाग या महत्वपूर्ण बाबीकडे लक्ष देत नाही त्या मूळे तालुक्यातील या रस्त्यांची मोजणी करण्यात यावी व अतिक्रमणे काढण्यात यावी.व अन्य ग्रामीण रस्त्यांची मोजणी सार्वजनिक रस्ते विभागाकडून करण्यात यावी अशी मागणीही अड्,गुरसळ यांनी केली आहे.तसेच शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी कमाल भूधारण कायद्याखाली काढून घेण्यात आल्या आहेत.त्यांच्या शर्ती भंग केल्या असतील तर त्या काढून मूळ मालकांच्या वारसांना परत देण्यात याव्यात.जलसंपदा विभागामार्फत पाटपाण्याच्या चाऱ्यांचे पुन्हा दुरुस्त्या करण्यात याव्यात.आदी मागण्याही अड्.गुरसळ यांनी शेवटी आ.काळे यांच्याकडे केल्या आहेत.