जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

अपंग नागरिक समाजाचा अविभाज्य भाग-दडीयाल

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

दिव्यांग व्यक्ती या समाजाचा महत्वाचा भाग असून त्यांना सन्मानाने जगण्याचा हक्क असल्याने त्यांच्या समस्या व त्यांच्या गरजेचे साहित्य देण्याचे काम आपण प्राधान्याने करू असे आश्वासन शिवसेनेचे शहर प्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांनी नुकतेच दिले आहे.

कोपरगाव शहरातील शिवसेना अपंग सहाय्य सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांची भेट घेतली त्या वेळी ते बोलत होते.

यावेळी अपंग सहाय्य सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब लांडे,तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पारखे,कार्याध्यक्ष किशोर हिवरे, संतोष जगधने, रामनाथ औताडे, मुजिम शेख, वाहतूकसेनेचे इरफान शेख,विशाल झावरे,विभागप्रमुख विजय शिंदे आदी शिवसैनिक उपस्थित होते.

त्या वेळी पुढे बोलताना म्हणाले की,गरजू अपंग व्यक्तींना आधुनिक,टिकाऊ व शास्त्रीय उपकरणे व इतर साहित्य उपलब्ध करून देणे ज्यायोगे त्यांच्या वास्तविक, सामाजिक व मानसिक पुनर्वसनास मदत होईल ते अपंग असल्याचा त्यांच्या जीवनशैलीवर होणारा परिणाम कमी होईल व त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल.राज्य शासनाच्या विविध अपंग योजनांचा आढावा घेऊन जमेल ती मदत करणार असून शिवसेना सदैव कोपरगावातील अपंगांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहील असेही ते शेवटी म्हणाले.

Related Articles

Close