कोपरगाव तालुका
कोपरगाव परिसरात दोन चोऱ्या,१.१२ लाखांचा अवैज लंपास,
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर ग्रामपंचायत हद्दीत दि.०६ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून त्या घरात प्रवेश करून त्यातील कपाटाची उचका पाचक करून त्यातील १५ रुपये किमतीची जुनी वापरती सोन्याची एक तोळ्याची पोत,०७ हजार रुपये किमतीचे चार ग्राम वजनाचे कानातील कर्ण फुले व एक ओम पान,२० हजार रुपये रोख,असा ४२ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याचा गुन्हा फिर्यादी सचिन उंडे यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.तर दुसऱ्या गुन्ह्यात सुभद्रानगर परिसरात रहिवाशी असलेले मनीष सुभाष जाधव यांच्या घराचे दुपारी १२.३० वाजेच्या दरम्यान याच पद्धतीने चोरी करून घरातील ७० हजारांच्या चीजवस्तू व रोख रक्कम असा एकूण १.१२ लाख रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला आहे.त्यामुळें शिंगणापूर,सुभद्रानगर या परिसरात खळबळ उडाली आहे.
वर्तमानात कोरोना साथीचा जोर ओसरत चालला असताना आता पर्यंत दबा धरून बसलेल्या चोरट्यानी आपले रंग दाखविण्यास सुरुवात केल्याचे दिसायला लागले आहे.त्याची चुणूक आता दिसू लागली आहे.त्याचेच प्रत्यन्तर दिसून आले आहे.शिंगणापूर ग्रामपंचायत हद्दीत काल दुपारी तर दुसरी घटना सुभद्रानगर परिसरात घडली असून नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
वर्तमानात कोरोना साथीचा जोर ओसरत चालला असताना आता पर्यंत दबा धरून बसलेल्या चोरट्यानी आपले रंग दाखविण्यास सुरुवात केल्याचे दिसायला लागले आहे.त्याची चुणूक आता दिसू लागली आहे.त्याचेच प्रत्यन्तर दिसून आले आहे.शिंगणापूर ग्रामपंचायत हद्दीत काल दुपारी फिर्यादी सचिन बजरंग उंडे (वय-३१) हे काही कामानिमित्त बाहेर गेले असताना त्यांच्या पाळतीवर असलेले अज्ञात चोरट्यानी आपला रंग दाखवला आहे.व घराचे कुलूप तोडून त्यांनी घरात प्रवेश करून कपाटातील १५ रुपये किमतीची जुनी वापरती सोन्याची एक तोळ्याची पोत,०७ हजार रुपये किमतीचे चार ग्राम वजनाचे कानातील कर्ण फुले व एक ओम पान,२० हजार रुपये रोख,असा ४२ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याचा गुन्हा फिर्यादी सचिन उंडे यांनी दाखल केला आहे.
दरम्यान दुसऱ्या घटनेत दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास बंद घराचे कुलूप तोडून घरी कोणी नाही हि बाब हेरून अज्ञात चोरट्याने सुभद्रानगर बाजार समिती कॉर्नर या ठिकाणच्या परिसरातील फिर्यादी मनीष जाधव यांच्या घराचे कुलूप तोडून त्यातील ४५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे तीन तोळ्याचे गंठन,२५ हजार रोख,त्यात ५०० दराच्या ५० नोटा असा ७० हजारांचा ऐवज लुटून नेला आहे.दोन्ही चोऱ्या एकाच पद्धतीने केल्या असल्याने चोरटे एकाच असावे असा कयास व्यक्त होत आहे.
या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसानी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.७५१/२०२०,२५०/२०२०,भा.द.वि.कलम ४५४,३८० प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ए. आर.दारकुंडे,पो.हे.कॉ.आर.पी.पुंड आदि अधिकारी करीत आहेत.चोरट्यानी कोपरगाव शहर पोलिसांपुढे आव्हान उभे केले आहे.