जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

जीवनात ‘जे’काही मिळाले ‘ते’ निवाऱ्यामुळे-कोयटे

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

आपल्या राजकीय वाटचालीत आपण ज्या ठिकाणी आज पोहचलो आहे ते निवारा सोसायटीमुळेच असे कौतुकॊद्गार राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी आज सकाळी नऊ वाजता निवारा सहकारी सोसायटीच्या संपन्न झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना काढले आहे.

दरम्यान आपण आपल्या राजकीय वाटचालीत नगराध्यक्ष होऊ शकलो नसल्याचे शल्य बोलून दाखवताना त्यांनी आपल्या पत्नीचा उल्लेख “त्यांच्या” हातावर राजयोगी हस्तरेखा असल्याने त्यांना ते शक्य झाले मात्र ते पद आपल्या नशीबात नव्हते-ओमप्रकाश कोयटे,अध्यक्ष राज्य पतसंस्था फेडरेशन.

कोपरगाव शहरातील निवारा सहकारी हौसिंग सोसायटीचे स्वमालकीचे सातबारा व आठ ‘अ’ उताऱ्यांचा तब्बल ३७ वर्षांनी आज वाटपाचा कार्यक्रम सकाळी नऊ वाजता संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर.टी.पटेल हे होते.

सदर प्रसंगी माजी नगरसेवक मधुकर पवार,नगरसेवक जनार्दन कदम,दीपा गिरमे,वैभव गिरमे,सुरेंद्र व्यास,व्यापारी आर.टी. पटेल.माजी संचालक भाऊराव कोते सर,कचरू मोकळ,चंद्रकांत माळी,माजी सचिव बाळासाहेब म्हस्के,देव ताई,आदी मान्यवरांसह बहुसंख्य सोसायटीचे सभासद व नागरिक उपस्थित होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की,आपण १९८२-८३ च्या प्रतिकूल काळात हि संकल्पना राबविण्याचा निर्णय आपण वयाच्या तिसाव्या वर्षी घेतला त्या वेळी आपल्याला स्व मालकीची सायकल नव्हती याची आठवण आवर्जून केली आहे.दरम्यान आपली अनेक हितशत्रूंनी “पुड्यावाला”(किराणा दुकानात पुडे बांधणारा म्हणून) म्हणून हेटाळणी केली असल्याची कटू आठवण जागी केली व “ती”टीका आपल्याला जिव्हारी लागल्याने हा प्रकल्प आपण नेटाने चालवला व २७३ घरांचा प्रकल्प पूर्ण केला.त्यावेळी एक एकर क्षेत्र आपण विकत घेतले पण त्याला अनंत अडचणी आल्या त्यावर आपण नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासामुळे मात करता आली. त्यावेळी तत्कालीन पाटबंधारे मंत्री विजयसिंह महिते पाटील यांच्या हस्ते आपण उदघाटन केले होते.अनेक वावड्यानी ठेकेदाराने काम सोडले त्यामुळे आपणच या प्रकल्पाचे काम सुरु केले व ठेकेदार बनलो असल्याचे सांगितले.पुढे या वाटचालीत आपल्याला कै.मधुकर पिटके गुरुजी,शरद नागरे,कमलाकर अकोलकर,सुभाष देव,माजी सचिव बाळासाहेब म्हस्के,चंद्रकांत माळी पेंटर,सुरेंद्र व्यास,श्री देव आदींचे सहकार्य विसरू शकत नाही.या निवारा परिवाराने आपल्याला जीवनात व राजकीय वाटचालीत वेगवेगळ्या निवडणुकात मोठे मताधिक्य दिले आहे.त्यामुळे आपली पुढील वाटचाल सुकर झाली असल्याचे अभिमानाने सांगितले आहे.या वाटचालीत निवारा हे कुटुंब समजून या परिसरात मतभेद नको म्हणून आपण अन्य पक्षाची शाखा या ठिकाणी उघडू दिली नाही व या परिसराची शांती भंग होऊ दिली नाही.पुढे काय होईल हे सांगता येणार नाही.या सोसायटीचे विसर्जन कारवाई करावी लागली व त्यातूनच जागा स्व मालकीची होण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे सांगितले आहे.आज सर्वांच्या नावावर सातबारा उतारे होत आहे,हि अतीव समाधान देणारी बाब आहे.व आपण या जबाबदारीतून मुक्त झालो असून आपल्या वरील “तो” एक डाग आपण हटवला असल्याचे सांगीतले आहे.या सोसायटीत पायाभूत पक्के रस्ते,भूमिगत गटारी,सार्वजनिक जागांचे सुशोभीकरण,मंदिरे,शाळा,व्यायामशाळा आदींचे करण्याचे काम असो ते सर्व केले आहे.आजही नगरसेवक जनार्दन कदम दीपा गिरमे हे काम करीत आहे.व सर्व पायाभूत सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे.

या कार्यक्रमाचे प्रास्तविक कोते सर यांनी केले या सोसायटीच्या उभारणीत व सातबारा स्वतंत्र अकरण्यात ज्या नागरिकांनी योगदान दिले त्या सर्वांचे त्यांनी शाल,हार,श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला आहे.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन समता इंटरनॅशनल स्कूलचे संचालक संदीप कोयटे यांनी केले.उपस्थितांचे आभार जनार्दन कदम यांनी मानले.

Related Articles

Close