कोपरगाव तालुका
कोपरगावात दुचाकीची चोरी,गुन्हा दाखल
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगावातील धारणगाव रास्त्यावरील डॉ.फडके हॉस्पिटल नजीक रहिवाशी असलेले सेवासिंग हरभजनसिंग सहानी (वय-४२)यांची टी.व्ही.एस.स्टार सिटी या घरासमोर लावलेल्या ३० हजार रुपये किमतीची दुचाकीची (क्रं.एम.एच.१७ बी.डब्ल्यू.१५६०) अज्ञात आरोपीने दि.१८ सप्टेंबर रोजी रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेऊन चोरी केली आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी सेवासिंग सहानी यांनी आपल्या घरच्या समोर आपली वरील क्रमांकाची दुचाकी उभी करून ठेवली असताना अज्ञात चोरट्याने बाहेर कोणी नाही हि संधी शोधून सुमारे तीस हजार रुपये किमतीची दुचाकी आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी लबाडीने चोरी केली आहे.
या बाबत त्यांनी कोपरगाव शहर पोलिसानी आपल्या दप्तरी गु.र.नं.७३१/२०२० भा.द.वि कलम ३७९ प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.पी.पुंड हे करीत आहेत.