जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

..या ग्रामीण रुग्णालयास वैद्यकीय साहित्याची मदत

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णाच्या संख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत असून कोरोना बाधित गंभीर रुग्णांना पुढील उपचार कोपरगाव मध्येच मिळावे यासाठी आ.आशुतोष काळे यांनी आपल्या विकास निधीतून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयासाठी १६ ऑक्सिजन बेड,२ व्हेंटीलेटर व २ बायपॅप मशीन दिले असल्याची माहिती रुग्ण कल्याण समिती सदस्य डॉ.अजय गर्जे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

कोपरगावमध्येच उपचार व्हावे यासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये १६ ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून सोबत २ व्हेंटीलेटर व २ बायपॅप मशीन दिले देखील देण्यात आले आहे. एकून २० बेडचे हे अद्यावत अतिदक्षता विभाग लवकरच सुरु करण्यात येणार आहे.या मध्ये १६ बेड आय.सी.यु.प्रमाणे असणार असून सर्व बेडला सेंटर ऑक्सिजन पुरवठा करण्यात येणार आहे.४ बेड साठी व्हेंटीलेटर बसविण्यात येणार असून ५ मॉनिटर,१ डी फेब्रीलेटर मशीन व इसीजी मशीन या विभागात असणार आहे-डॉ.गर्जे

कोपरगाव शहर व तालुक्यात पुन्हा एकदा कोरोना विषाणूच्या साथीने कहर केला असून दोन वाजण्याच्या सुमारास आलेल्या अहवालात केलेल्या अँटीजन रॅपिड टेस्ट बाधित रुग्णांची संख्या ३६ झाली आहे त्यात कोपरगाव शहरातील ०२ बाधित निघाले तर ग्रामीण भागातील ३४ जण बाधित असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.दरम्यान आता कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या १ हजार ७०१ इतकी झाली आहे.त्यात १८० रुग्ण सक्रिय आहेत,तर आतापर्यंत २९ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.त्यामुळे कोरोना साथी बाबत नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.नागरिकांना आताच उपचारासाठी खाटा मिळणे अवघड बनले आहे.तर शिर्डी येथील उपचाराला स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे.या पार्श्वभूमीवर या मदतीला महत्व आले आहे. गंभीर रुग्णांना जिल्हा रुग्णालयाशिवाय पर्याय नव्हता.गंभीर रुग्णांना शिर्डी येथे उभारलेल्या कोविड केअर सेंटर मध्ये उपचार मिळावे यासाठी आ.काळे यांनी प्रयत्न देखील केले मात्र शिर्डीकरांनी विरोध दर्शविला आहे.

याची आ.काळे यांनी गंभीर दखल घेवून यापुढे कोरोना बाधित गंभीर रुग्णांवर कोपरगावमध्येच उपचार व्हावे यासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये १६ ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून सोबत २ व्हेंटीलेटर व २ बायपॅप मशीन दिले देखील देण्यात आले आहे. एकून २० बेडचे हे अद्यावत अतिदक्षता विभाग लवकरच सुरु करण्यात येणार आहे.या मध्ये १६ बेड आय.सी.यु.प्रमाणे असणार असून सर्व बेडला सेंटर ऑक्सिजन पुरवठा करण्यात येणार आहे.४ बेड साठी व्हेंटीलेटर बसविण्यात येणार असून ५ मॉनिटर,१ डी फेब्रीलेटर मशीन व इसीजी मशीन या विभागात असणार आहे अशी माहिती डॉ.गर्जे यांनी दिली असून पुढील आठवड्यात या सुविधा गंभीर व अंत्यवस्थ रुग्णांना मिळणार असल्याचे सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close