जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती उत्साहात संपन्न

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

भारतीय जनसंघ व भारतीय जनता पक्षाचे आदर्श व्यक्तिमत्व व एकात्म मानववादाचे उदगाते पं.दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती कोपरगाव नगरपरिषदेत आज मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.या निमित्त विनम्र कोपरगाव नगर परिषदेचे कर्मचारी सुरेश शिंदे यांच्या हस्ते तर नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे अभिवादन करण्यात आले आहे.

नुकत्याच कोपरगाव नगरपरिषदेच्या १५ सप्टेंबर रोजी संपन्न झालेल्या सर्वसाधारण सभेत अग्निशमन दलाच्या नवीन इमारतीला “पंडित दीनदयाळ उपाध्याय अग्निशमन केंद्र”असे नांव देण्याचा ठराव एकमताने संमत करण्यात आला.त्याबद्दल सर्वपक्षीय नगरसेवक यांचे आभार-विजय वहाडणे,अध्यक्ष कोपरगाव नगरपरिषद.

पंडित दीनदयाळ उपाध्याय हे भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय सचिव होते.डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासह भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत यांचा महत्त्वाचा वाटा होता.भारतीय जनसंघातून पुढे भारतीय जनता पक्षाचा उगम झाला.पं. दीनदयाळ उपाध्याय १९३७ साली कानपूर येथे संघाचे स्वयंसेवक झाले व १९४२ मध्ये प्रचारक झाले. साधी राहणी व उच्च विचारसरणी हा त्यांचा स्थायीभाव होता. शास्त्रे, धर्मग्रंथ, आणि तात्त्विक ग्रंथांच्या चिंतनातून व मननातून त्यांनी ‘एकात्ममानववाद’ हा सिद्धान्त मांडला व भारतीय समाजापुढे ठेवला.दि.११ फेब्रुवारी १९६८ रोजी दीनदयाळांची अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या केली.मुघलसराय रेल्वे स्थानकाच्या रुळांजवळ त्यांचे शव आढळले होते.आता या जंक्शनचे नाव पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन असे करण्यात आले आहे.वर्तमानात नगराध्यक्षपदी भाजपच्या विचारसरणीचे अध्यक्ष लाभल्याने त्यांची जयंती गत चार वर्षांपासून पालिकेत संपन्न होत आहे.नुकत्याच कोपरगाव नगरपरिषदेच्या १५ सप्टेंबर रोजी संपन्न झालेल्या सर्वसाधारण सभेत अग्निशमन दलाच्या नवीन इमारतीला “पंडित दीनदयाळ उपाध्याय अग्निशमन केंद्र ” असे नांव देण्याचा ठराव एकमताने संमत करण्यात आला.त्याबद्दल सर्वपक्षीय नगरसेवक यांचे आभार कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वाहाडणे यांनी मानले आहे.या कार्यक्रमास पालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचारीं उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close