कोपरगाव तालुका
जिल्हा काॅग्रेस कमिटी अ.जा.विभागाची बैठक संपन्न
जनशक्ती न्यूजसेवाकोपरगाव-(प्रतिनिधी)कोपरगांव येथे गाव तेथे शाखा अभियानाची चौथ्या टप्प्यातील महत्वपूर्ण बैठक प्रदेश समन्वय बंटीभाउ यादव,शिवाजी जगताप समन्वय,अहमदनगर जिल्हा कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र वाघमारे,काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक खांबेकर,मनोहर बिडवे जिल्हा उपाध्यक्ष,विजय आढाव सचिव अहमदनगर जिल्हा, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली आहे.
अहमदनगर जिल्हयामध्ये प्रत्येक गावात शाखा उभी राहिल यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करणार आहोत.काॅग्रेस हा बहुजनांचा पक्ष असुन तळागाळातील शोषित पिढीत लोकांना सोबत घेवुन जाणारा पक्ष आहे.सत्तेच्या माध्यमातुन प्रत्येक गोर गरिब जनतेपर्यंत शासकीय योजनांचा लाभ आम्ही मिळवुन देणार आहोत-अशोक खांबेकर
यावेळी बंटी यादव म्हणाले की,गाव तेथे शाखा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या व अंबोरे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे हा पॅटर्न आम्ही राबविणार आहोत.अहमदनगर जिल्हयामध्ये प्रत्येक गावात शाखा उभी राहिल यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करणार आहोत.काॅग्रेस हा बहुजनांचा पक्ष असुन तळागाळातील शोषित पिढीत लोकांना सोबत घेवुन जाणारा पक्ष आहे.सत्तेच्या माध्यमातुन प्रत्येक गोर गरिब जनतेपर्यंत शासकीय योजनांचा लाभ आम्ही मिळवुन देणार आहोत असे आवाहन त्यांनी केले.यावेळी विविध पदाधिका-यांच्या निवड करण्यात आल्या.त्यामध्ये प्रामुख्याने आदित्य काॅम्युटर एज्युकेशनचे संचालक व सामाजिक कार्यकर्ते रविंद्र साबळे यांची कोपरगांव शहराध्यक्षपदी तर चंद्रकांत बागुल तालुकाअध्यक्ष,कार्यअध्यक्ष यादवराव त्रिभुवन,तालुका सचिव ज्ञानेश्वर भगत यांची नियुक्ती करण्यात आली.यावेळी युवा जिल्हाध्यक्ष आर.पी.आय.उमेश शेजवळ,सचिन बोरणे, तालुकाध्यक्ष श्रीरामपुर,कांबळे नेवासा तालुकाध्यक्ष,बाळासाहेब पगारे,राहाता तालुकाध्यक्ष युसुफ शेख,पी.आर.पी.शहरअध्यक्ष,बाळासाहेब दिघे यांच्यासह पदाधिकारी,कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.