कोपरगाव तालुका
धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करा-मागणी
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यातील धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश असल्याचे अनेक पुरावे असताना आजही हा समाज दुर्लक्षित ठेवलेला आहे त्यामुळे स्वातंत्र्या नंतरही या समाजाचे अतोनात नुकसान झाले आहे.शेजारच्या राज्यात या आरक्षणाची अंमलबजावणी सुरु असताना राज्यात मात्र या समाजाची उपेक्षा आजही सुरु आहे.त्यामुळे या समाजाला तातडीने आरक्षण मिळावे अशी मागणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर क्षत्रिय धनगर सेवा संघाच्या वतीने आज कोपरगावचे तहसीलदार यांचेकडे करण्यात आली आहे.
धनगर समाजाचा उल्लेख सरकारच्या यादीत धनगर ऐवजी “धनगड” असा चुकून झालेला असताना आजच्या राज्यकर्त्यांनी त्या बाबत दुरुस्ती करण्याऐवजी या समाजाला आजही आरक्षणापासून वंचित ठेवण्याचे पाप केले आहे.या बाबत विविध धनगर समाजाच्या संघटनांनी वारंवार सरकारकडे पाठपुरावा करूनही सरकार त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे-किरण थोरात,कार्यकर्ता
धनगर समाजाचा उल्लेख सरकारच्या यादीत धनगर ऐवजी “धनगड” असा चुकून झालेला असताना आजच्या राज्यकर्त्यांनी त्या बाबत दुरुस्ती करण्याऐवजी या समाजाला आजही आरक्षणापासून वंचित ठेवण्याचे पाप केले आहे.या बाबत विविध धनगर समाजाच्या संघटनांनी वारंवार सरकारकडे पाठपुरावा करूनही सरकार त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.त्यामुळे या समाजाच्या अनेक पिढ्यांचे न भरून येणारे आर्थिक,शैक्षणिक नुकसान झाले आहे.सरकारच्या केवळ अंमलबजावणीचा प्रश्न असताना राजकीय कारणासाठी केवळ समाजच्या पिळवणूक सुरु आहे.त्यामुळे सरकारने तातडीने अंमलबजावणी करावी अशी मागणीही आज कोपरगावचे तहसीलदार यांना निवेदन देऊन राज्याचे मुख्य मंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडॆ केली आहे.
त्या वेळी क्षत्रिय धनगर समाज संघाचे अध्यक्ष भाऊसाहेब शेळके,उपाध्यक्ष अशोकराव घोलप,सचिव रमेश टिक्कल आदी मान्यवर उपस्थित होते.