जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

औद्योगिक संस्थेचा भांडारपाल लाच घेताना “अटक”

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत भांडारपाल पदावरून सेवानिवृत्त होऊन गेले असता त्यांच्या काळातील काही चीजवस्तू कमी असल्याची बतावणी करून ती पूर्ववत करण्यासाठी व अधिभार निरंक करण्यासाठी रुपये ५० हजारांची लाच मागून त्यातील ३० हजार रुपये स्वीकारताना आज पुणतांबा चौफुलीवर हॉटेल आनंद समोर ती स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक अधिकांऱ्यानी नूतन भांडारपाल तथा आरोपी विलास चिमाजी कुसाळकर यास रंगेहात पकडल्याने खळबळ उडाली आहे.या बाबत आंबेगाव,कात्रज ता.हवेली येथील फियादी जावई (वय-३३) यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केल्यावर हि कारवाई करण्यात आली आहे.

कोपरगाव येथीलशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत फिर्यादी इसमाचे सासरे हे “भांडारपाल” या पदावर कार्यरत होते.ते ऑगष्ट २०१८ मध्ये सेवानिवृत्त झाले होते.मात्र त्यांचा अधिभार हा त्यांच्या समकक्ष कर्मचारी तथा आरोपी विलास कुसाळकर याने घेतला होता.मात्र सेवा निवृत्तीनंतर मिळणारे पेन्शन व सातवा वेतन फरक आदी लाभ मिळण्यात अडचण आली होती.ती त्यांच्या काळात भांडारपाल या पदावर काम करताना काही वस्तू कमी आढळल्या म्हणून त्यांचा कार्यभार घेणाऱ्या इसम विलास कुसाळकर याने त्याना अधिभार “निरंक” करण्यासाठी हि भरपाई करण्यासाठी सेवा निवृत्त सहकारी यांचेकडून सुमारे पन्नास हजारांची रक्कम दि.१८ सप्टेंबर रोजी मागितली होती.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत फिर्यादी इसमाचे सासरे हे “भांडारपाल” या पदावर कार्यरत होते.ते ऑगष्ट २०१८ मध्ये सेवानिवृत्त झाले होते.मात्र त्यांचा अधिभार हा त्यांच्या समकक्ष कर्मचारी तथा आरोपी विलास कुसाळकर याने घेतला होता.मात्र सेवा निवृत्तीनंतर मिळणारे पेन्शन व सातवा वेतन फरक आदी लाभ मिळण्यात अडचण आली होती.ती त्यांच्या काळात भांडारपाल या पदावर काम करताना काही वस्तू कमी आढळल्या म्हणून त्यांचा कार्यभार घेणाऱ्या इसम विलास कुसाळकर याने त्याना अधिभार “निरंक” करण्यासाठी हि भरपाई करण्यासाठी सेवा निवृत्त सहकारी यांचेकडून सुमारे पन्नास हजारांची रक्कम दि.१८ सप्टेंबर रोजी मागितली होती. व त्यातील तीस हजार रुपये आधी देण्याची मागणी केली होती.अर्थातच याचा राग सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या जावयाला तथा फिर्यादीला आला.त्यांनी या बाबत नाशिक येथील लाचलुचपत विभागाशी या बाबत संपर्क साधला व त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेतले व त्यानुसार त्यातील ३० हजार रुपयांची रक्कम देण्यास ते तयार झाले.व ती रक्कम देण्यासाठी पुणतांबा चौफुलीवर हॉटेल आनंद समोर जागा निश्चित झाली. व त्या प्रमाणे त्या ठिकाणी आरोपी विलास कुसाळकर हा आला असताना व सदर रक्कम सरकारी पंचासमक्ष स्वीकारत असताना लाच-लुपचत विभागाने लावलेल्या सापळ्यात अलगत अडकला आहे.या बाबत छायाचित्रण व चलचित्रण करण्यात आले आहे.

हा सापळा यशस्वी करण्यात नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने,यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक दीपक करांडे,अहमदनगर,पो.ह.तन्वीर शेख,पोलीस नाईक प्रशांत जाधव,विजय गंगूल,पो.शि.रवींद्र निमसे,वैभव पांढरे,म.पो.शि.राधा खेमनर,संध्या म्हस्के,चालक हेरून शेख,अशोक रक्ताटे यांनी महत्वपूर्ण भूमीका निभावली आहे.या सापळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.आपल्याच सहकाऱ्याला मदत नाकारणाऱ्या प्रवृत्तीला नेमकेपणाने शिक्षा झाल्याने “या” फिर्यादी जावयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close