कोपरगाव तालुका
“त्या” लुटीतील आरोपी अखेर जेरबंद !
जनशक्ती न्यूजसेवा
श्रीरामपूर-(प्रतिनिधी)
चितळी येथील बी.जे.पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक अक्षय जाधव पेट्रोल पंपावरील जमा रक्कम बॅगेत घेवून चितळी येथील बँकेत भरण्यासाठी नेहमी प्रमाणे आपल्या दुचाकीवर निघाले असता तेव्हा पाठीमागुन आलेल्या दुचाकी वरील तीन अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी अडवुण करत धमकी देत त्यांच्या कडील पैशाची बॅग हिसकावुन पसार झाले होते.पोलिसानी या बाबत तातडीने हालचाल केल्याने आरोपी जेरबंद केले आहे.
काल राहाता तालुक्यातील चितळी येथील बी.जे.पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक अक्षय जाधव पेट्रोल पंपावरील जमा रक्कम बॅगेत घेवून चितळी येथील बँकेत भरण्यासाठी नेहमी प्रमाणे आपल्या दुचाकीवर निघाले असता तेव्हा पाठीमागुन आलेल्या दुचाकी वरील तीन अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी अडवुण करत धमकी देत त्यांच्या कडील पैशाची बॅग हिसकावुन पसार झाले होते. दरम्यान, सदर प्रकाराची माहीती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार शंकर चौधरी यांना मिळल्याने त्यांनी चोरट्यांचा पाठलाग करत श्रीरामपूर तालुका पोलिसांच्या मदतीने सापळा रचुन जळगाव शिवारात सदर चोरट्यांना पकडण्यात यश आले.सदर घटनेची महिती मिळाल्यानंतर पोलीस उपाधिक्षक राहुल मदने,पोलीस निरीक्षक मसूद खान यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली.चोरट्यांना ताब्यात घेत पोलिसांनी एक लाख ६८ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.