कोपरगाव तालुका
“त्या”डॉक्टरला तीन दिवसांची कोठडी सुनावली
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयांमध्ये आपल्या पित्यासमवेत गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी आज संबंधित डॉक्टरला शिर्डी पोलिसांनी कोपरगाव येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयासमोर हजर केले असता दोन्ही बाजूंचा युक्तिवाद एकूण घेत न्यायालयाने नराधम डॉ.वैभव तांबे यास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती सरकारी वकील अशोक वहाडणे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
संबंधित डॉक्टर वैभव तांबे यास आज कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या.श्री भागवत यांच्यासमोर सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास हजर केले असता दोन्ही बाजूंचा सुमारे अर्धा तास युक्तिवाद झाला त्यानंतर न्यायालयाने आरोपी डॉ.वैभव तांबे यास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.आरोपीच्या वतीने अड्.जोशी यांनी तर सरकारी पक्षाचे वतीने अड्.अशोक वहाडणे यांनी काम पाहिले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,शिर्डी रहिवाशी असलेल्या एका कुटुंबातील अल्पवयीन मुलीला अस्वस्थ वाटू लागल्याने तिने या बाबत आपल्या वडिलांना कल्पना देऊन रुग्णालयात जाण्याची विनंती केली.वर्तमानात कोरोना विषाणूची साथ सूर असल्याने घाबरुन जाऊन वडिलांनी तातडीने आपल्या मुलीला शिर्डी येथील श्री साईबाबा सुपर रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी नेले असता संबंधित डॉक्टरने वडिलांना बाहेर थांबण्यास सांगून संबंधित रुग्णालयातील आरोपी डाँक्टरने मुलीला लज्जा उत्पन्न होईल असे आक्षेपार्ह वर्तन व भाष्य केले आहे.सदरची बाब पीडित मुलीने आपल्या आईला सांगितल्यावर या डॉक्टरचा भंडाफोड झाला.त्या नंतर पीडित मुलीच्या वडिलांनी पुन्हा दवाखान्यात येऊन रेकॉर्डिंग करून या घटनेची खातरजमा केली होती.व त्यानंतर आईने दिलेल्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिसांनी संबंधित डॉक्टर विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत (पोस्को) गुन्हा दाखल केला होता.शिर्डी पोलिसानी या प्रकरणी डॉ.वैभव तांबे यास रात्री उशिरा अटक केली होती.
संबंधित डॉक्टर वैभव तांबे यास आज कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या.श्री भागवत यांच्यासमोर सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास हजर केले असता दोन्ही बाजूंचा सुमारे अर्धा तास युक्तिवाद झाला त्यानंतर न्यायालयाने आरोपी डॉ.वैभव तांबे यास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.आरोपीच्या वतीने अड्.जोशी यांनी तर सरकारी पक्षाचे वतीने अड्.अशोक वहाडणे यांनी काम पाहिले आहे.दरम्यान या नराधम डॉक्टरचा नागरिकांनी निषेध केला असून या डॉक्टरच्या शिर्डी व परिसरातील अनेक नातेवाईकांनी हा मामला मिटून घेण्यासाठी पीडित मुलीच्या वडिलांना व त्यांच्या सहकारी मित्रावर मोठा दबाव आणल्याची चर्चा आहे.मात्र मुलीचा पिता हे नराधम डॉक्टरला शिक्षा व्हावी या मतांचे असल्याने त्यांचे काहीही चालले नाही.या घटनेचा सर्वत्र निषेध होत आहे.व साई संस्थानने भरती करताना अशा विक्षिप्त तरुणांचा भरणा दवाखान्यात करू नये व साई संस्थानला बदनाम करणाऱ्या या अपप्रवृत्तीचा बंदोबस्त करावा अशी मागणी पुढे आली आहे.