कोपरगाव तालुका
बबनराव निकम यांचे निधन
जनशक्ती न्यूजसेवा
संवत्सर-(प्रतीनिधी)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील रहिवासी व श्रीरामपूर येथे भारतीय आयुर्विमा कंपनीत लेखनिक पदावर कार्यरत असलेले बबनराव बाबुराव निकम (वय-६२)यांचे नुकतेच निधन झाले आहे.त्यांचा निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
स्व.बबनराव निकम हे राजेंद्र निकम यांचे जेष्ठ बंधू होते.त्यांनी नुकतीच विमा कंपनीतून सेवा निवृत्ती घेतली होती व त्या नंतर ते आपल्या मूळ गावी राहावयास आले होते.व येथेच स्थायिक झाले होते.त्यांच्या पच्छात एक मुलगा,एक मुलगी,दोन भाऊ,चुलते असा मोठा परिवार आहे.त्यांचा अंत्यविधी नगर येथील अमर धाम येथे शोकाकुल वातावरणात करण्यात आला आहे.