कोपरगाव तालुका
शिंदे यांची उत्तर महाराष्ट्राच्या उपाध्यक्षपदी निवड

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील दहिगाव बोलका येथील कार्यकर्ते भाऊसाहेब विश्वनाथ शिंदे यांची मानव संरक्षण समितीच्या उत्तर महाराष्ट्र समितीच्या उपाध्यक्ष पदी निवड झाली असल्याची माहिती राष्ट्रीय अध्यक्ष विजय कुराडे यांनी दिली आहे.त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
भाऊसाहेब शिंदे यांना पुर्वी पासून सामाजिक कार्याची आवड असून त्यांनी अनेक वर्षापासून विविध क क्षेत्रात काम केले आहे.त्यांच्या सामाजिक कामाची पावती म्हणून त्यांच्या नावाची शिफारस मानव संरक्षण समितीचे राज्याध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी केली होती.त्यांच्या निवडीचे महाराष्ट्र,गुजरात,गोवा,कर्नाटक,तेलंगणा,राज्याचे जनसंपर्क अधिकारी गजानन भगत यांनी स्वागत केले आहे.