कोपरगाव तालुका
कोपरगाव नगरपरिषदेची आज सर्व साधारण सभा
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषदेची आज सकाळी अकरा वाजता तब्बल सहा महिन्यानंतर सर्वसाधारण सभा दृक-श्राव्य माध्यमाद्वारे वेबेक्स या पोर्टलद्वारे संपन्न होत असून हि बैठक नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे.
कोपरगाव नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा या पूर्वी कोरोना साथीचा प्रारंभ होण्यापूर्वी २८ फेब्रुवारी रोजी संपन्न झाली होती.त्या नंतर हि सभा प्रथमच होत आहे.दरम्यान या कालावधीत पालिकेने नगर स्वच्छता अभियानात देशभरात ३०० व्या स्थानावारून १७ व्या स्थानावर झेप घेतली आहे.तर कोरोना साथीच्या रुग्णवाढीला बऱ्यापैकी आळा घातल्याचे बोलले जात आहे.मंगळवारी संपन्न होणाऱ्या या सभेपुढे एकूण २६ विषय ठेवण्यात आले आहे.
कोपरगाव नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा या पूर्वी कोरोना साथीचा प्रारंभ होण्यापूर्वी २८ फेब्रुवारी रोजी संपन्न झाली होती.त्या नंतर हि सभा प्रथमच होत आहे.दरम्यान या कालावधीत पालिकेने नगर स्वच्छता अभियानात देशभरात ३०० व्या स्थानावारून १७ व्या स्थानावर झेप घेतली आहे.तर कोरोना साथीच्या रुग्णवाढीला बऱ्यापैकी आळा घातल्याचे बोलले जात आहे.मंगळवारी संपन्न होणाऱ्या या सभेपुढे एकूण २६ विषय ठेवण्यात आले आहे.त्यात पहिला विषय हा मागील इतिवृत्त वाचून कायम करणे हा नित्याचा पण महत्वाचा असून अन्य २ ते ५ हे विषय नगरपरिषद कर्मचारी यांच्याशी संबंधित आहे.तर विषय क्रं. ६ विषय हा नगरपरिषद हद्दीतील भांडवली मूल्य आधारित पंचवार्षिक कर आकारणी करणे तसेच फेर आकारणी करण्याशी संबंधित असून विषय क्रं.७ हा नगर-मनमाड राज्य मार्गावरील पथ दिव्यांचे पोल बसविण्याशी संबधित आहे.तर विषय क्रं.८ व ९ हा घंटा गाड्या खरेदी करणे.व येसगाव येथील तलावावर असलेल्या विद्युत पंपाची शेड बांधनेशी संबंधित आहे.तर विषय क्रमांक १० हा मागणी प्रमाणे विविध प्रभागात जलवाहिन्या टाकणेशी संबंधित आहे.तर विषय क्रं.११ हा येसगाव साठवण तलाव क्रं.५ यासाठी तांत्रिक सल्लागार नेमणेशी संबंधित आहे.तर विषय क्रमांक १२ हा शहर वहातुकी साठी महत्वाच्या ठरणाऱ्या धारणगाव रस्ता संभाजी पुतळा ते डॉ.आंबेडकर पुतळा दरम्यान रस्त्याचे दुभाजकासह काम करणेशी संबधीत आहे.तर पुढील विषय हे १४ व वित आयोग,नगरपरिषद हद्दीत सिटी सर्व्हे क्रं. २०८८४-२०८५ हा खुले नाट्यगृह विकसित करण्याशी संबंधित आहे.तर पुढील विषय नगरपरिषद हद्दीतील जागेत पूर्वी मंजुर केलेले व्यापारी संकुल बांधणेशी संबंधित आहे.विषय क्रं.१६ हा नगरपरिषद हद्दीतील सिटी सर्व्हे क्रं.१९२४ व ५६ चे आरक्षण वगळून सदर ठिकाणी सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प करण्यासाठी आरक्षण टाकण्याशी संबंधित आहे.विषय क्रं.१७ हा पंतप्रधान आवास योजनेच्या तांत्रिक सल्लागारास मुदतवाढ देणे,तर विषय क्रं.१८ हा सिटी सर्व्हे क्रं.१६२० मधून रस्ता जोडण्याशी संबंधित आहे.तर विषय क्रं.बंदिस्त नाट्यगृहाचा भाडेपट्टा ठरवणे,विषय क्रं.२० व २१ हा उच्च न्यायालयाचे आदेशाबाबत आहे.तर विषय क्रं.२२ हा रस्ता हस्तांतरण करणे बाबत आहे.विषय क्रं.२३ हा ग्रीन झोन बाबत आहे.तर विषय क्रं.२४ हा निसर्ग कन्सल्टंसी यांच्या न्यायालयाच्या कज्जा बाबत आहे.तर विषय क्रं.२५ हा नगरसेवक यांच्या आलेल्या अर्जा बाबत तर विषय क्रं.२६ हा ऐन वेळच्या विषयाबाबत आहे.त्यामुळे या सभेकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.