कोपरगाव तालुका
..ते फरार चार आरोपी अखेर जेरबंद !
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत व सावळगाव शिवारात दरोड्याचा गुन्ह्यातील गत दीड वर्षांपासून फरारी असलेले चार दरोडेखोर नामदेव फुलचंद जाधव,ज्ञानेश्वर पांडुरंग जाधव,भिवसेन भारम भोसले,पांडुरंग फुलचंद जाधव आदींना नुकतेच विविध ठिकाणी व विविध वेळी सापळा रचून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी जेरबंद केले असून त्यांच्या या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले आहे.
नाशिक येथील फिर्यादी कुटुंबास स्वस्तात सोने देतो म्हणून आमिष दाखवून कोपरगाव तालुक्यातील सावळगाव शिवारात निर्जन स्थळी गत वर्षी ऑगष्ट महिन्यात दुपारी अडीच वाजेच्या सुमारास बोलावून घेतले होते.व त्या ठिकाणी शस्राचा धाक दाखवून त्यांच्याकडील १० लाखांची रोकड लांबवली होती व फरार झाले होते.त्यानंतर नाशिक येथील फिर्यादी कुटुंबाने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा केला होता.
यातील घटना हि कोपरगाव तालुक्यातील सावळगाव शिवारात गत वर्षी ऑगष्ट महिन्यात घडली होती त्यात आरोपी नामदेव फुलचंद जाधव रा.वडगाव ता.कोपरगाव,ज्ञानेश्वर पांडुरंग जाधव,रा.वडगाव ता.कोपरगाव,भिवसेन भारम भोसले,रा.पढेगाव ता.कोपरगाव पांडुरंग फुलचंद जाधव वडगाव ता.कोपरगाव आदींनीं नाशिक येथील फिर्यादी कुटुंबास स्वस्तात सोने देतो म्हणून आमिष दाखवून कोपरगाव तालुक्यातील सावळगाव शिवारात निर्जन स्थळी गत वर्षी ऑगष्ट महिन्यात दुपारी अडीच वाजेच्या सुमारास बोलावून घेतले होते.व त्या ठिकाणी शस्राचा धाक दाखवून त्यांच्याकडील १० लाखांची रोकड लांबवली होती व फरार झाले होते.त्यानंतर नाशिक येथील फिर्यादी कुटुंबाने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा र.क्रं.१०४/१९ भा.द. वी. कलम ३९५,३९७ या दरोड्यांसह म.को.का.दाखल केला होता.त्या नंतर यातील १३ आरोपी पैकी चांगदेव भारम भोसले,हिरू बडोद भोसले,करणं बाळू मोहिते,भगीरथ बडोद भोसले आदी चार आरोपी कोपरगाव तालुका पोलिसानी जेरबंद केले होते. मात्र यातील दरोडेखोर नामदेव फुलचंद जाधव,ज्ञानेश्वर पांडुरंग जाधव,भिवसेन भारम भोसले,पांडुरंग फुलचंद जाधव आदीं चार आरोपी मात्र परागंदा झाले होते.त्यामुळे हा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे निर्माण झाले होते.शोध घेऊनही हे आरोपी मिळून येत नव्हते.अनेक ठिकाणी शोध घेऊनही तालुका पोलिसांना हात हलवत परतावे लागले होते.मात्र पोलिसांचा निश्चय अटळ होता. व त्यांनी या बाबत आपला शोध थांबवला नव्हता.अखेर पोलिसानी विविध ठिकाणी शोध घेऊन अखेर यातील आरोपी व दरोडेखोर नामदेव फुलचंद जाधव,ज्ञानेश्वर पांडुरंग जाधव,भिवसेन भारम भोसले,पांडुरंग फुलचंद जाधव आदींना नुकतीच विविध ठिकाणी शोध घेऊन अटक केली आहे.त्यासाठी
पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंग,यांच्या आदेशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे,श्रीरामपुर विभाग,उपविभागीय पोलीसअधिकारी सोमनाथ वाकचौरे,आदींचे मार्गदर्शन लाभले आहे.सदर आरोपींना पकडण्यासाठी पो.नि.अनिल कटके,पो.उप निरीक्षक सचिन इंगळे पो.ना. ए. यु.सय्यद व पो.ना.ए.आर.शिंदे आदींसह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांचे परिश्रम कामी आले आहे.या आरोपींना जेरबंद केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून या आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.