जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

शिंगणापुरात आजी-माजी पदाधिकाऱ्यांत हाणामारी

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहराच्या ईशानेन्स साधारण चार की.मी.अंतरावर संजीवनी कारखान्याच्या जवळ असलेल्या शिंगणापूर ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशी व पंचायत समितीच्या सदस्यांचे पतीराज कैलास चंद्रभान संवत्सरकर व शिंगणापुरचे माजी सरपंच अंकुश चंद्रभान संवत्सरकर या दोघांच्या दोन गटात आज सकाळी १०.४५ वाजेच्या सुमारास रेल्वे स्थानकाच्या फाटकासमोर हाणामारी होऊन कोपरगाव शहर पोलिसानी या दोघांच्यासह आठ समर्थकांच्या विरुद्ध आज गुन्हा दाखल करून त्यांना अटक केल्याने खळबळ उडाली आहे.

दरम्यान या हाणामारीच्या कारणांचा शोध घेतला असता आरोपी अंकुश कुऱ्हे यांचा मुलगा शेळ्या चारत असताना त्याच्या शेळ्या दुसरा आरोपी कैलास संवत्सरकर याच्या गाडीला आडव्या गेल्याच्या तात्कालिक कारणावरून हि हाणामारी झाल्याची माहिती उपलब्ध झाली असल्याचे समजते.त्यामुळे शिंगणापूर व परीसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.या दोन्ही गटाचे पूर्व वैमनस्य असल्याची माहिती उपलब्ध आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव शहराच्या नजीक शिंगणापूर ग्रामपंचायत हद्दीत कोपरगाव रेल्वे स्थानक येते.आज सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास कोपरगाव शहर पोलिसांना एक दूरध्वनी आला व त्यांनी कोपरगाव रेल्वे स्थानकासमोर दोन गटात अज्ञात कारणामुळे हाणामारी सुरु असल्याची खबर दिली होती.त्यानुसार कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळाकडे रवाना झाले असता त्या ठिकाणी त्यानां कोपरगाव पंचायत समितीच्या सदस्यांचे पतीराज कैलास संवत्सरकर,दत्तू गोरख संवत्सरकर विलास चंद्रभान संवत्सरकर,बापूसाहेब विठ्ठल संवत्सरकर,नानासाहेब गोरख संवत्सरकर,व दुसऱ्या गटाचे माजी सरपंच अंकुश चंद्रभान कुऱ्हे,नितीन अंकुश कुऱ्हे,गोरख दिनकर कुऱ्हे, आदी आठ जण आपल्या तोंडाला मुखपट्या न बांधता व कोरोना विषाणूची साथ चालू असल्याची माहिती असतानाही सामाजिक शांतता भंग करताना हाणामारी करताना आढळून आले असता त्या सर्वांना पोलिसानी ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मांगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ए.एम.दारकुंडे हे करीत आहेत.

या बाबत पोलीस कॉन्स्टेबल अंबादास रामनाथ वाघ (वय-६२) यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गु.र.न.६५९/२०२० भा.द.वि.कलम १६०,१८८,(२),२६९,२७० प्रमाणे वरील दोन्ही गटाच्या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून या सर्वांना अटक केली आहे.या घटनेने शिंगणापूर परिसरात खळबळ उडाली आहे.दरम्यान यातील बरेच आरोपी भा.द.वि.कलम.३०७ अन्वये शिक्षा झालेले असून ते जामिनावर बाहेर आलेले असल्याची विश्वसनिय माहिती हाती आली असून यातील अनेकांवर जिल्हा सत्र न्यायालयात अनेक गंभीर गुन्हे या पूर्वी दाखल झालेले आहे.त्यात सरकारी कामात अडथळा आणण्यासह महिलांना मारहाणीच्या गुन्ह्यांचा समावेश असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यांची या परिसरात दहशत असल्याची माहिती आहे.पोलिसानी या आरोपीविरुद्ध कठोर कारवाई केल्याने कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close