जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात दोन दिवसाआड पाणी द्या-मागणी

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात नागरिकांना आता दोन दिवसाआड पिण्याचे पाणी द्यावे तसेच शहरात डासांची संख्या विलक्षण वाढल्याने तातडीने डास प्रतिबंधात्मक औषध फवारणी करावी आदी मागण्या कोपरगाव तालुका बळीराजा पार्टी तर्फे कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्यधिकारी प्रशांत सरोदे यांचेकडे केल्या आहेत.

मागील काही वर्षापासुन कोपरगाव शहरासाठी जलसंपदा विभागाकडून वेळेवर पाणी पुरवठा होवून देखिल शहरातील नागरिकांना पाच दिवस आड पाणी पुरवठा केला जातो.पाच दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात पाणी साठवणूक करून ठेवतात,दारोदारी मोठ्या प्रमाणात पाणी साठा असल्याने त्यास डासांची व अन्य जंतूंची उत्पती होवून नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे की,मागील काही वर्षापासुन कोपरगाव शहरासाठी जलसंपदा विभागाकडून वेळेवर पाणी पुरवठा होवून देखिल शहरातील नागरिकांना पाच दिवस आड पाणी पुरवठा केला जातो.पाच दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात पाणी साठवणूक करून ठेवतात,दारोदारी मोठ्या प्रमाणात पाणी साठा असल्याने त्यास डासांची व अन्य जंतूंची उत्पती होवून नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.सध्या कोरोना आजाराने थैमान आहे शिवाय साठवलेल्या पाण्यातील डास,जंतूंमुळे अन्य रोगाची साथ पसरल्यास कोपरगावची आरोग्याची प्रतिकूल परीस्थिती निर्माण होणार आहे.जर पाणी पुरवठा दिवसाआड केल्यास आपोआप पाणी साठवणूक चे प्रमाण कमी होवून रोगराईस आळा बसण्यास मदत होणार आहे. तसेच सध्या पावसाळ्याचे दिवस आहे रस्त्यावर असलेल्या खड्ड्यात पाणी साठून त्याव्दारे साथीचे आजार बळावण्याची शक्यता आहे.तरी कृपया सदर प्रकारात जातीने तातडीने लक्ष घालून शहराचा पाणी पुरवठा दोन दिवसआड करावा तसेच शहरात जंतुनाशक औषध फवारणी करावी आदी मागण्याही बळीराजा पार्टी कोपरगाव यांचे वतीने करण्यात करण्यात आल्या आहेत.

या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास नगरपालिके समोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येईल असा इशाराही शेवटी देण्यात आला आहे. या वेळी उपस्थित बळीराजा पार्टी तालुका अध्यक्ष अमोल आचारी, उपाध्यक्ष किरण महाजन सचिव अनिल गाडेकर, अखिलेश देशमुख, तसेच बापुराव चव्हाण, सोपान महाजन आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Close