शैक्षणिक
सोमैया महाविद्यालयात ग्रीस येथील प्रा.लुम्पाउ यांच्या व्याख्यानाचे आयोजन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील के.जे.सोमैया महाविद्यालयात नुकतेच प्राध्यापक प्रबोधिनी च्या वतीने अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या अंतर्गत ग्रीस देशाच्या मिनिस्ट्री ऑफ़ एजुकेशन मधिल प्रा.रानिया लुम्पाउ यांनी ‘ब्रैन बेसड एज्युकेशन: द सीक्रेट टु अ सक्सेसफुल लर्निंग’ या विषयावर ऑनलाइन पद्धतीने व्याख्यान दिले अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस्. यादव यांनी दिली आहे.
दरम्यान यापूर्वी के.जे.सोमैय्या महाविद्यालयाने यापूर्वी अफगाणिस्थान,थायलंड इ.देशातील प्राध्यापकांचे आंतरराष्ट्रीय व्याख्यानांचे आयोजन प्राध्यापक प्रबोधिनी अंतर्गत करण्यात आले असल्याचे सांगितले आहे.महाविद्यालयाच्या या उपक्रंमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आपल्या व्याख्यानात प्रा.रानिया लुम्पाउ यांनी मेंदूवर अधारित शिक्षण हे यशस्वी शिक्षणाचे रहस्य असल्याचे प्रतिपादन केले.त्यांनी आपल्या व्याख्यानात न्यूरो सायन्स,संज्ञानात्मक विज्ञान व त्याचे भावना यामधील नाते,शिक्षणातील भावनेचे महत्व,भावनेचे विज्ञान,लिम्बिक प्रणाली,मेंदूच्या सक्षम शिक्षणाची तत्त्वे कि ज्यामध्ये शिक्षण प्रणाली मध्ये मेंदू हा सामाजिक,समस्या निवारक असतो असे सांगताना सहभागी आणि निष्क्रिय अध्यापन पद्धती यामधील भेद स्पष्ट केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे समन्वयक व प्राध्यापक प्रबोधिनिचे सदस्य डॉ.रविंद्र जाधव यांनी केले आहे.दरम्यान यापूर्वी अफगाणिस्थान,थायलंड इ. देशातील प्राध्यापकांचे आंतरराष्ट्रीय व्याख्यानांचे आयोजन प्राध्यापक प्रबोधिनी अंतर्गत करण्यात आले असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी आय.क्यु.ए.सी.चे समन्वयक प्रा.डॉ.विजय ठाणगे यांनी मेंदू वर आधारीत शिक्षण पद्धती ही विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास करते व व्याख्यानामधून प्रा.रानिया लुम्पाउ यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने समजावुन सांगितले असे प्रतिपादन करून महविद्यालयाच्या वतीने गेस्ट ऑफ़ ऑनर्स या प्रमाणपत्राने प्रा.रानिया लुम्पाउ यांना सन्मानित केले.
प्रा.वर्षा आहेर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले तर डॉ.एन.टी.ढोकळे यांनी उपस्थितांचे आभार मानले आहे.या प्रसंगी प्राध्यापक प्रबोधिनी चे अध्यक्ष डॉ.आर.के.कोल्हे,डॉ.सुरेखा भिंगारदिवे,डॉ.अभिजीत नाईकवाडे व सर्व प्राध्यापक उपस्थीत होते.