जनशक्ती न्यूजसेवा
श्रीरामपूर-(प्रतिनिधी)
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढ दिवसानिमित्त श्रीरामपूर येथे भाजपाच्या वतीने रक्तदान शोबिराचे आयोजन करण्यात आले होते त्याला नागरिकांचा प्रतिसाद लाभला आहे.
भारतीय जनता पक्षाच्या श्रीरामपुर तालुका शाखेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्ताने बेलापुरातील जैन मंदिर येथे रक्तदान शिबीराचे
आयोजन जेष्ठ पत्रकार देविदास देसाई यांच्या हस्ते करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.या वेळी भाजपाचे सुनिल मुथा जि.प.सदस्य शरद नवले,अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे,भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनिल वाणी,माजी तालुकाध्यक्ष अनिल भनगडे,माजी शहराध्यक्ष मारुती बिंगले,युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल यादव, युवा मोर्चा चिटणीस विशाल अंभोरे,प्रवासी संघटनेचे रणजीत श्रीगोड,दिलीप काळे,मारुती राशिनकर,राम पोळ,रविंद्र खटोड,रविंद्र कोळपकर,अरविंद शहाणे, दिलीप दायमा,किशोर खरोटे,अरुण धर्माधिकारी,प्रसाद लढ्ढा,मुकुंद लबडे,महेश खरात,पप्पू कुलथे,अक्षय कावरे,विशाल गायधने आदि मान्यवर उपस्थित होते. जनकल्याण रक्तपेढीच्या वतीने डाँ.दिलीप दाणे,डाँ.विलास मढीकर,श्रीमती धामणगावाकर,त्रिवेणी माहुरे,के.पी.यादव,बाळासाहेब खरपुडे यांनी रक्तदानाचे काम चोख पार पाडले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी भाजपाचे शहराध्यक्ष प्रफुल्ल डावरे,पुरुषोत्तम भराटे,पप्पु पौळ,सुरेश बढे,ओमप्रकाश व्यास,राकेश कुंभकर्ण, सागर ढवळे,महेश खरात,रमेश अमोलीक आदिंनी विशेष प्रयत्न केले.