कोपरगाव तालुका
कोपरगाव शहरात चोरी,अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात असलेल्या वाणी सहकारी सोसायटीत रहिवाशी असलेल्या व वृंदावन डायग्नोस्टिक सर्व्हिसेस च्या संचालिका डॉ.अर्चना संदीप मुरूमकर यांच्या घरी अज्ञात चोरट्याने खिडकीतून अज्ञात साधन वापरून फिर्यादीच्या सासूबाई यांची पर्स काढून त्यातील रेड मी नोट-७ या भ्रमनध्वनिसह रोख रक्कम रुपये ३९ हजार रुपये लंपास केले आहे.
फिर्यादी महिला अर्चना मुरूमकर या डॉक्टर असून त्या वाणी सोसायटी या परिसरात आपल्या बंगल्यात आपल्या कुटूंबासमवेत राहतात.त्यांच्या कुटुंबात सासूबाई या आपल्या खोलीत झोपलेल्या असताना मध्य रात्रीच्या सुमारास ते आज सकाळी ६.३० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने अज्ञात साधनांचा वापर करून खिडकीत हात घालून आत ठेवलेली भ्रमणध्वनी सह पर्स हातोहात लांबवली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी महिला अर्चना मुरूमकर या डॉक्टर असून त्या वाणी सोसायटी या परिसरात आपल्या बंगल्यात आपल्या कुटूंबासमवेत राहतात.त्यांच्या कुटुंबात सासूबाई या आपल्या खोलीत झोपलेल्या असताना मध्य रात्रीच्या सुमारास ते आज सकाळी ६.३० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने अज्ञात साधनांचा वापर करून खिडकीत हात घालून आत ठेवलेली भ्रमणध्वनी सह पर्स हातोहात लांबवली आहे.त्यांनी या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी आपल्या दप्तरी अज्ञात चोरट्याविरुद्ध गु.र.न.६२४/२०२० भा.द.वि.कलम ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.पी.पुंड हे करीत आहेत.