कोपरगाव तालुका
समृद्धी महामार्गाचे काम निकृष्ट-..या आमदारांची तक्रार

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
समृद्धी महामार्गामध्ये ज्या ठिकाणी वीजवाहिन्या समृद्धी महामार्ग ओलांडून जात आहे त्या ठिकाणी भूमिगत टाकण्यात येणाऱ्या वीजवाहिन्यांना टणक पाईपाचे वेष्टन असणे व वीजवाहिन्या आराखड्यानुसार जमिनीखाली योग्य अंतरावर असणे बंधनकारक आहे.रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर भविष्यात या वीजवाहिन्यांमध्ये बिघाड झाला तर त्या वीज वाहिन्या दुरुस्त करता येणे शक्य होईल. मात्र सबंधित ठेकेदाराने कोणत्या प्रकारचे वेष्ठण पाईप वापरले याची पाहणी करण्यासाठी गेलेल्या आ.आशुतोष काळेंना सदर वीजवाहिन्या वीणा वेष्ठणच टाकल्याचे निदर्शनास येताच सबंधित ठेकेदार,समृद्धी महामार्गाचे अधिकारी,महावितरण व महाराष्ट्र रस्ते विकास मंडळाच्या अधिकाऱ्यांची आ.आशुतोष काळे यांनी चांगलीच खरडपट्टी काढली असल्याचे धक्कादायक वृत्त हाती आले आहे.
कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे ग्रामपंचायत हद्दीत अनेक शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्ग ओलांडून जात असलेल्या वीज वाहिन्यांना ठेकेदार निकृष्ट दर्जाचे वेष्टन पाईप वापरत असून नागरिकांना समजू नये यासाठी रात्रीच्या वेळीच हे काम उरकून घेत असल्याच्या तक्रारी आ. काळे यांच्याकडे मांडल्या होत्या.त्यावेळी हा गफला उघड झाला आहे.
मुंबई–नागपूर द्रुतगतीमार्ग किंवा महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा ७०१ किमी लांबीचा, ८ पदरी, २१२० मीटर रुंदीचा नियोजित महामार्ग आहे. हा मार्ग महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईला महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरशी जोडेल. हा महामार्ग १० जिल्ह्ंयातून,२६ तालुक्यांतून आणि ३९० गावांमधून जाणार आहे आणि या मार्गामुळे मुंबई आणि नागपूरमधील प्रवास ८ तासात पूर्ण होईल .या प्रकल्पासाठी सुमारे ५६,००० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.या महामागाचे काम कोपरगाव तालुक्यातून सर्वाधिक मंद गतीने सुरु आहे.त्याची पाहणी करण्यासाठी नुकताच चांदेकसारे ग्रामपंचायत हद्दीत आ.आशुतोष काळे यांनी पाहणी दौरा करून या महामार्गाबाबत बैठक घेतली तेंव्हा हा गफला उघड झाला आहे.
या बैठकी दरम्यान आ.काळे यांनी समृद्धी महामार्गाच्या कामामुळे बुजलेल्या चाऱ्या,विविध ठिकाणी प्रस्तावित व आवश्यक असलेल्या ठिकाणी करावयाचे असलेले वापर बोगदे,कोपरगाव तालुक्यातील समृद्धी महामार्गाचे काम करीत असलेली कंपनी वापरत असलेले ग्रामीण मार्ग (व्ही.आर) तसेच इतर जिल्हा मार्ग (ओ.डी.आर.) यांची दुरुस्ती,समृद्धी महामार्गामुळे वीज वाहिन्यांचे निर्माण झालेले प्रश्न,समृद्धी महामार्गाचे काम करीत असलेल्या सहठेकेदारांनी मशिनरी मालकांचे व कामगारांचे थकविलेली देयके,ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीतून समृद्धी महामार्गासाठी गौण खनिज घेतले आहे त्या गौण खनिजाची उत्खनन व वाहतूक करतांना खराब झालेले रस्ते व निर्माण शेतकऱ्यांच्या अडचणी,तसेच समृद्धी महामार्गाचे काम करीत असलेल्या स्थानिक कामगारांच्या अडचणी याबाबत चर्चा करून आढावा घेतला. या बैठकीदरम्यान अनेक शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्ग ओलांडून जात असलेल्या वीज वाहिन्यांना ठेकेदार निकृष्ट दर्जाचे वेष्टन पाईप वापरत असून नागरिकांना समजू नये यासाठी रात्रीच्या वेळीच हे काम उरकून घेत असल्याच्या तक्रारी आ. काळे यांच्याकडे मांडल्या होत्या.
त्यावेळी या तक्रारीची खातरजमा करण्यासाठी आ.काळे यांनी या वीजवाहिन्या ज्या ठिकाणी रस्ता ओलांडून जात आहे त्या ठिकाणी प्रत्यक्ष जावून जे.सी.बी.च्या सहाय्याने उकरून समृद्धी महामार्ग ओलांडून गेलेल्या वीज वाहिन्यांची पाहणी केली.त्यावेळी या वीजवाहिन्यांना निकृष्ट दर्जाचे वेष्टण तर सोडाच परंतु या वीज वाहिन्या आराखड्याच्या पातळीनुसार खूपच वर असल्याचे व या वीज वाहिन्यांना कोणत्याही प्रकारचे वेष्टन वापरले नसल्याचे आढळून येताच ते संतापले व सबंधित ठेकेदार,समृद्धी महामार्गाचे अधिकारी व महाराष्ट्र रस्ते विकास मंडळाच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. व सबंधित ठेकेदाराकडून हे काम काढून घेवून नियोजित आराखड्यानुसार उच्च दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांना काम देण्याच्या सूचना केल्या.तसेच यापूर्वी कोपरगाव तालुक्यात ज्या ठिकाणी वीजवाहिन्या समृद्धी महामार्ग ओलांडून गेल्या आहेत त्या सर्वच ठिकाणी उकरून महाराष्ट्र रस्ते विकास मंडळ,समृद्धी महामार्ग,महावितरणचे अधिकारी व स्थानिक शेतकऱ्यांना सोबत घेवून पाहणी करावी.यापुढे ज्या ठिकाणी वीजवाहिन्या समृद्धी महामार्ग ओलांडून जाणार आहे त्या ठिकाणी सर्व अधिकारी व स्थानिक शेतकऱ्यांना समोर दिवसा काम करावे असे आदेश त्यानी दिले. या कामात गलथानपणा करणाऱ्या सर्वच दोषींवर तातडीने कारवाई करावी. तसेच अशा प्रकारचे काम कोपरगाव तालुक्यात खपवून घेतले जाणार नाही अशी तंबी दिली आहे.समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या गायत्री कंन्स्ट्रक्शनचे प्रकल्प व्यवस्थापक ताताराव डुंगा व त्यांच्या सहकाऱ्यांना दिली. यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम
यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,गौतम बँकेचे उपाध्यक्ष धोंडीराम वक्ते,रस्ते विकास महामंडळाचे उपअभियंता एस.के.बावा,टीमलीडर प्रशांत ताडवे,वीज वितरण कंपनीचे सूर्यवंशी,निरगुडे,बोन्डकर,गायत्री कन्स्ट्रक्शनचे ताताराव डुंगा,आदी उपस्थित होते.