कोपरगाव तालुका
सामान्य प्रश्न मार्गी न लावणाऱ्यांनी सांभाळून बोलावे-आवाहन
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषदेचे नगरसेवक म्हणवून मिरवून घेतांना ज्यांना प्रभागातील गटारी करता आल्या नाही त्यांनी आपली पात्रता पाहून बोलावे असे खडे बोल राष्ट्रवादीचे नगरसेवक गटनेते विरेन बोरावके व नगरसेविका माधवी वाकचौरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
ज्या माजी आमदारांच्या पक्षाचे गल्ली पासून दिल्ली पर्यंत सरकार असतांना त्यांना हा प्रश्न मार्गी का लावता आला नाही याचे उत्तर चेल्यांनी आपल्या नेत्यांना अगोदर विचारले पाहिजे. ज्यावेळी आ.काळे यांनी याबाबत नगररचना,मूल्यनिर्धारण विभागाचे संचालकाची भेट घेतली त्यावेळीच माजी आमदारांना या नागरिकांची आठवण का झाली नाही ? मग पाच वर्ष काय केलं ?-बोरावके
कोपरगाव शहरातील कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील सर्व्हे नं. ११३ (भाग) व ११४ (भाग) मधील लक्ष्मीनगर भागातील शासकीय जागेवरील नागरिकांची अतिक्रमणे नियमानुकूल करण्याबाबत आ. आशुतोष काळे यांनी नगररचना,मूल्यनिर्धारण विभागाचे संचालकाची भेट घेवून अतिक्रमण नियमानुकूल होण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत.याचे श्रेय आपल्याला मिळणार नाही याची पराभूत आमदारांनी आपल्या चेल्यांना पुढे करून टीका केली होती. त्या टीकेला उतर देतांना गटनेते विरेन बोरावके व नगरसेविका माधवी वाकचौरे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून खरपूस समाचार घेतला आहे.
त्यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात पुढे असे म्हटले आहे की,लक्ष्मीनगर भागातील शासकीय जागेवरील नागरिकांची अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची पूर्वीपासूनची नागरिकांची मागणी आहे. ज्या माजी आमदारांच्या पक्षाचे गल्ली पासून दिल्ली पर्यंत सरकार असतांना त्यांना हा प्रश्न मार्गी का लावता आला नाही याचे उत्तर चेल्यांनी आपल्या नेत्यांना अगोदर विचारले पाहिजे. ज्यावेळी आ.काळे यांनी याबाबत नगररचना,मूल्यनिर्धारण विभागाचे संचालकाची भेट घेतली त्यावेळीच माजी आमदारांना या नागरिकांची आठवण का झाली नाही ? मग पाच वर्ष काय केलं ? असा सवाल उपस्थित करून लोकांना वेड्यात काढायचे बंद करा असा सल्ला नगरसेवक गटनेते विरेन बोरावके व नगरसेविका सौ.माधवीताई वाकचौरे यांनी माजी आमदार व त्यांच्या चेल्यांना दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात दिला आहे. मागील सहा महिन्यापासून तुमच्या नेत्याला फलक लावण्यास मिळत नसल्याचे दु:ख आम्ही समजू शकतो मात्र आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी आपण कुणावर भुंकतो हे सुद्धा लक्षात घ्या.काळे परिवार कुणावर टीका करीत नाही याचा अर्थ त्यांचे कार्यकर्ते सर्व सहन करतील असा अर्थ काढू नये. वेळ आल्यास काय होवू शकते याचा एक नमुना यापूर्वी तुम्हाला दाखवला आहे. त्यामुळे वक्तव्य करतांना काळजी घ्या अन्यथा येत्या काळात वेगळ्या पद्धतीने जशास तसे उत्तर दिले जाईल असा ईशारा गटनेते विरेन बोरावके व नगरसेविका माधवी वाकचौरे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात शेवटी दिला आहे.