कोपरगाव तालुका
..या गावात बिबट्या,दोन शेळ्या फस्त,ग्रामस्थांत दहशत !
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव ग्रामपंचायत हद्दीत मराठवाडा एक्सप्रेस कालव्याच्या नजीक नुकताच बिबट्या आढळून आला असून त्याने हरिभाऊ रामभाऊ आहेर यांच्या दोन शेळ्या फस्त केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.त्यामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
ब्राम्हणगाव परिसरात बिबट्या आढळून आला आहे.प्रथम हा बिबट्या प्रितेश पैठणकर यांच्या वस्तीवर आला होता मात्र त्याची वस्तीवर शेतकऱ्यांना चाहूल लागल्याने त्याने तेथून काढता पाय घेतला होता व त्या नंतर त्याने आपला मोर्चा हरिभाऊ आहेर यांच्या वस्तीकडे वळवला व तेथे त्याने बाहेर बांधलेल्या दोन शेळ्या नजीकच्या शेतात नेऊन फस्त केल्या आहेत.
कोपरगाव तालुक्यात यंदा पाऊसपाणी चांगले असल्याने खरीप पिके मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे.त्यामुळे जंगली प्राण्यांना लंपन झाल्याने बहुधा ब्राम्हणगाव परिसरात बिबट्या आढळून आला आहे.प्रथम हा बिबट्या प्रितेश पैठणकर यांच्या वस्तीवर आला होता मात्र त्याची वस्तीवर शेतकऱ्यांना चाहूल लागल्याने त्याने तेथून काढता पाय घेतला होता व त्या नंतर त्याने आपला मोर्चा हरिभाऊ आहेर यांच्या वस्तीकडे वळवला व तेथे त्याने बाहेर बांधलेल्या दोन शेळ्या नजीकच्या शेतात नेऊन फस्त केल्या आहेत.या बाबत शेतकऱ्यास उशिरा जग आली तो पर्यंत त्याने आपला कार्यभाग उरकला होता.हि घटना उघड झाल्यावर या ग्रामस्थांनी या घटनेची तक्रार वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे.हि घटना अकरा ऑगष्ट रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे.या बाबत तेथील गावाचे पोलीस पाटील रवींद्र निवृत्ती देवकर यांनी आमच्या प्रतिनिधीस या बाबत माहिती दिली आहे.त्यांनी वं विभागाकडे या बिबट्याच्या बंदोबस्त करण्याची व हा परिसर भयमुक्त करण्याची मागणी केली आहे.व या भागातील शेतकऱ्यांनी आपले पशुधन सांभाळून ठेवावे असे आवाहन केले आहे.